Kamala Harris may resign from vice president post  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेत राजकीय भुकंप, कमला हॅरिस यांचं पद जाणार?

जो बायडेन यांच्या अधिकाऱ्यांकडून कमला हॅरिस या अमेरिकन लोकांशी खेळत आहे.असा आरोप केला जात आहे

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि उपराष्ट्रपती (Vice President) कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात काही कारणावरून बिनसलं असल्याची माहिती समोर येत आहे.याबाबत बोलताना कमला हॅरिस यांचे कर्मचारी म्हणतात की त्यांना बाजूला केले जात आहे, तर जो बायडेन यांच्या अधिकाऱ्यांकडून कमला हॅरिस या अमेरिकन लोकांशी खेळत आहे.असा आरोप केला जात आहे याशिवाय, कमला हॅरिस यांचे मंजूरी रेटिंग देखील गेल्या काही महिन्यांत जो बायडेन यांच्या मंजूरी रेटिंगपेक्षा अधिक घसरले आहे.अशा स्थितीत कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदावरून हटवले जाऊ शकते,अशी माहिती मिळत आहे. यासाठी जो बायडेन हे कमला हॅरिस यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याचा बातम्या देखील समोर येत आहेत. (Kamala Harris may resign from vice president post)

याबाबत अधिक माहिती देताना व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्त वहिनीला कमला हॅरिस आणि त्यांचे सहकारी देशाच्या सीमेवरील संकटासारखे 'वो विन' मुद्दे नियुक्त केल्याबद्दल अध्यक्षांवर नाराज आहेत. अमेरिकेसाठी हे संवेदनशील मुद्दे आहेत, ज्याला सामोरे जाणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहे. त्याचबरोबर जो बायडेन यांचे सहकारी देखील कमला हॅरिसवर यांच्यावर नाराज आहेत.ते प्रत्येक गोष्टीला हॅरिस यांनाच कारणीभूत ठरवत आहेत.

अमेरिकेच्या एका वृत्त वाहिनीने एका अहवालानुसार जो बायडन यांना 53 टक्के अमेरिकन नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. आणि व्हाईट हाऊस जरी बायडन आणि हॅरिस यांच्यात कोणताच वाद नसल्याचे सांगत असले तरी हा वाद आता हळूहळू समोर यायला सुरूवात झाली आहे. विवारी रात्री व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी यावर स्पष्टीकरण देताना एक ट्विट देखील केले आहे. "कमला हॅरिस एक महत्वपूर्ण सहकारी आणि एक धाडसी नेत्या आहेत त्यांनी देशासमोरील महत्त्वाच्या आव्हानांना तोंड दिले आहे"

तर दुसरीकडे कमला हॅरिस यांचे सहकारी असा दावा करत आहेत की त्यांना अपयशी सिद्ध करण्यासाठी बिनकामी पोर्टफोलिओ सोपवण्यात आला आहे. कमला हॅरिसच्या एका माजी उच्च सहाय्यकाने एका वृत वहिनीला सांगितले की, "सरकार वारंवार चुकीच्या परिस्थितीत हॅरिस यांना अमेरिकेच्या सीमा समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठवत आहे." आणि त्यांच्यासाठी आता करो की मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT