Imran Khan & Maryam Nawaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: 'तुम्ही आता इम्रानच्या पक्षात सामील व्हा...', मरियम शरीफ यांचा सरन्यायाधींशावर हल्लाबोल

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे.

यातच आता, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच फैलावर घेतले.

मरियम म्हणाल्या की, 'सरकारी तिजोरीतून 6,000 कोटी रुपयांची लूट करणार्‍या माणसाची सुटका करण्यात सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांना आनंद झाला असेल.'

मरियम यांनी पुढे सरन्यायाधीशांवर असाही आरोप केला की, 'तुम्ही आता इम्रानच्या पक्षात सामील व्हा. इम्रान हा तुमचे सासरे ख्वाजा तारिख रहमान यांच्याही जवळचा आहे.'

इम्रान यांच्या सुटकेवरुन गदारोळ

बांदियाल यांनी गुरुवारी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची अटक 'बेकायदेशीर' असल्याचे म्हटले. तसेच, सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की, 'न्यायालयाच्या आवारातून कोणत्याही आरोपीला अटक करता येणार नाही.'

सरन्यायाधीशांनी फटकारल्यानंतर पाकिस्तानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एनएबी) इम्रान यांची तात्काळ सुटका केली.

दुसरीकडे, इम्रान शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात जामीनासाठी गेले होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला.

याशिवाय, तोशखाना प्रकरणात इम्रान यांच्याविरुद्धच्या सर्व कायदेशीर कारवाईला अंतरिम स्थगितीही दिली.

मात्र, पाकिस्तानचे (Pakistan) गृहमंत्री आणि पीएमएलएन नेते राणा सनाउल्ला यांनी शुक्रवारी सकाळी स्पष्ट केले की, "इम्रान मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात गुंतला आहे. आम्ही त्याला पुन्हा अटक करु."

इम्रान खान यांना दहशतवादी म्हटले

सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्यावर हल्ला करताना मरियम म्हणाल्या की, "देशाच्या भविष्याशी खेळणाऱ्या दहशतवाद्याचे मदतनीस होऊन तुम्ही तुमची प्रतिष्ठा गमावली आहे."

सरन्यायाधीशांना इशारा देताना त्यांनी पोस्ट केली की, "तुम्ही तुमची खुर्ची इम्रानच्या राजकारणासाठी वापरत आहात, त्यामुळे आता राजकीय प्रतिक्रियांसाठी तयार राहा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT