jill biden Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: धाडस पाहा! जो बायडन यांच्या पत्नीने कमला हॅरिस यांच्या पतीला सगळ्यासमोर केलं किस

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी रात्री कॅपिटल हिल येथे त्यांच्या स्टेट ऑफ द युनियनला संबोधित केले.

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी जिल बायडन सध्या खूप चर्चेत आहेत. जिल यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांचे सगळ्यांसमोर चुंबन घेतले. या घटनेनंतर जिल बायडन यांची चर्चा होत आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी रात्री कॅपिटल हिल येथे त्यांच्या स्टेट ऑफ द युनियनला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान जिल बायडन यांनी कमला हॅरिसचे पती डग एमहॉफ यांच्या थेट ओठांवर चुंबन घेतले.

या घटनेनंतर सोशल मीडिया विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. जिल बायडन कमला हॅरिसच्या नवऱ्याचे चुंबन घेतल्याचे एका युजरने म्हटले असून, यावेळी तिच्या समोर कोण आहे हे तिला माहीत नव्हते का? असे त्यांने म्हटले आहे.

तर "जिल बायडन आणि कमला यांच्या पतीसोबत आज रात्री स्टेट ऑफ द युनियनचे सेक्सी ओपनिंग." अशी प्रतिक्रिया एका दुसऱ्या नेटकऱ्याने दिली आहे.

जो बायडन यांनी मंगळवारी त्यांच्या स्टेट ऑफ द युनियन भाषण केले. कोविड-19 आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतरही अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा चांगल्या स्थितीत आहे. असे जो बायडन आपल्या भाषणात म्हणाले.

जो बायडन यांनी रिपब्लिकनना अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी आणि राष्ट्र एकसंध ठेवण्याचे आवाहन केले. "कोरोना महामारीतून अमेरिका अधिक मजबूत झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने आमचे व्यवसाय बंद केले, आमच्या शाळा बंद केल्या आणि आमच्याकडून बरेच काही काढून घेतले… पण आता परिस्थिती बदलली आहे. आता आम्ही जगातील सर्वात यशस्वी अर्थव्यवस्था आहोत." असे बायडन यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT