Jews attack worshipers at Al-Aqsa Mosque
Jews attack worshipers at Al-Aqsa Mosque Twitter
ग्लोबल

जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत पुन्हा चकमक, 24 जण जखमी, तिघांना अटक

दैनिक गोमन्तक

जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीमध्ये (Al-Aqsa mosque) पॅलेस्टिनी (Palestine) आणि इस्रायली (Israel) पोलिसांमध्ये पुन्हा चकमकी झाल्या आहेत. शुक्रवारी चकमकीत 42 जण जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईनच्या रेड क्रॉस संघटनेने सांगितले की, या ठिकाणी बराच काळ तणावाचे वातावरण होते. मुस्लिमांच्या पवित्र रमजान (Ramadan)महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ही हाणामारी झाली. रेड क्रॉसने सांगितले की सर्व परिस्थीती नियंत्रणात आली आहे. परंतु 22 जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

इस्रायली पोलिसांनी सांगितले की, दंगलखोरांनी पश्चिम भिंतीच्या बाजूला दगड आणि फटाके फेकले तेव्हा पोलिसांना कंपाऊंडमध्ये प्रवेश करावा लागला. अल-अक्साच्या (Al-Aqsa) पश्चिम भिंतीखाली, अल-अक्सा हे ज्यूंचे पवित्र स्थान आहे.

दंगल शांत करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी दंगल रोखण्यासाठी योग्य त्या सर्वच उपायांचा वापर केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. साक्षीदारांनी एएफपीला सांगितले की, पोलिसांनी अश्रूधुराचा आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला. यामध्ये दोन जणांना दगडफेक केल्याबद्दल आणि एकाला जमावाला भडकवल्याबद्दल अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

या ठिकाणी मुस्लिम उपासक सुरक्षिततेने मशिदीत प्रवेश करत आहेत, पण जेरुसलेमच्या जुन्या शहरात तणाव कायम आहे. इस्रायलच्या ताब्यातील पूर्व जेरुसलेमचा हा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये अल-अक्साच्या कंपाऊंडमध्ये झालेल्या संघर्षात जवळपास 300 पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. अल अक्सा मशीद हे मुस्लिमांसाठी तिसरे पवित्र स्थळ आहे आणि ज्यूंसाठी ते सर्वात पहिले पवित्र स्थळ आहे. त्याला ते टेम्पल माउंट म्हणतात. रमजानच्या काळात इस्त्रायलने या ठिकाणावर केलेल्या हल्ल्याने जगभरात वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. पण जेरुसलेममध्ये अस्थिरता पसरवण्याच्या तयारीत असलेल्या हमास आणि इस्लामिक जिहाद या इस्लामिक गटांविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडण्यात आल्याचे इस्रायलच्या ज्यू राष्ट्राचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT