Jensen Huang Dainik Gomantak
ग्लोबल

Jensen Huang Net Worth Drop: राजीनामा देताच जेन्सन हुआंग यांना मोठा झटका! एका झटक्यात बुडाले तब्बल 60,000 कोटी रुपये; जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Jensen Huang Net Worth Drop 6.4 Billion Dollars: जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत 4.25 टक्क्यांची घसरण झाली असून त्यांची एकूण संपत्ती आता 144.7 अब्ज डॉलरवर आली.

Manish Jadhav

Jensen Huang Net Worth Drop 6.4 Billion Dollars: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'एनवीडिया'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. गुरुवारी एनवीडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या संपत्तीत तब्बल 6.4 अब्ज डॉलर म्हणजेच 60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद समोर आली.

अमेरिकन बाजारपेठेत एनवीडियाच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण यामागील मुख्य कारण ठरली, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या वैयक्तिक संपत्तीवर झाला. सध्या ते एनवीडियाचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक आहेत, परंतु वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही वादांमुळे आणि एका चिनी गुप्तचराशी संबंध असल्याच्या संशयामुळे त्यांच्या संपत्तीला मोठा फटका बसला.

फोर्ब्स रिअल-टाइम बिलियनेअर्स लिस्टनुसार, जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत 4.25 टक्क्यांची घसरण झाली असून त्यांची एकूण संपत्ती आता 144.7 अब्ज डॉलरवर आली. या ताज्या घसरणीमुळे ते जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले असून आता जगातील 13 वे सगळ्यात श्रीमंत उद्योजक ठरले. गेल्या आठवड्यापर्यंत ते जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट होते, परंतु नवीन घडामोडींमुळे त्यांच्या नेटवर्थमध्ये वेगाने घट होत आहे.

दुसरीकडे, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार त्यांची एकूण संपत्ती 138 अब्ज डॉलरवर आली असून, चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत तब्बल 29.8 अब्ज डॉलरची घट नोंदवली गेली. गुरुवारी सुरुवातीच्या सत्रात कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या घसरणीसह 151 डॉलरवर उघडले होते आणि नंतर ते थेट 14.38 टक्क्यांच्या घसरणीसह 148.80 डॉलरवर घसरले, जो त्यांचा गेल्या 52 आठवड्यांतील नीचांकी स्तर होता. दिवसभरात काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर शेअर्स (Shares) सावरले, परंतु या सर्व घडामोडींमुळे टेक जगतात खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Microsoft Outlook Servers Down: मायक्रोसॉफ्ट आउटलुकचे सर्व्हर अचानक ठप्प! लाखो युजर्सना ईमेल पाठवणे आणि लॉग-इन करण्यात अडचण

UAE Highway Truck Accident: युएईमध्ये मध्यरात्री काळाचा घाला! अनियंत्रित ट्रकने 23 वाहनांना उडवले; भारतीय नागरिकांसह 14 जणांचा जागीच मृत्यू

Daily Horoscope: अध्यात्म आणि प्रवासाचा शुभ योग! 'या' राशींच्या संपत्तीत होणार भरघोस वाढ; शुक्रवार ठरणार अत्यंत खास

VIDEO: 10-15 नव्हे तर तब्बल 500हून अधिक डॉल्फिन! मालवणच्या समुद्रात एकाच वेळी दिसला डॉल्फिनचा मोठा कळप; पाहा व्हायरल व्हिडिओ

Nepal Electric Van Accident: नेपाळमध्ये भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली इलेक्ट्रिक व्हॅन 500 मीटर खोल दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू; 5 गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT