Javed Akhtar Dainik Gomantak
ग्लोबल

Javed Akhtar: 'ते अजूनही तुमच्या देशात राजरोसपणे फिरत आहेत...' 26/11 च्या हल्ल्यावरुन पाकिस्तानवर टीका

Javed Akhtar: यावेळी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar: लाहोरमधील फैज फेस्टीव्हल 2023 मध्ये गीतकार जावेद अख्तर सामील झाले होते. यावेळी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत टीका केली आहे.

दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिल्याने त्यांनी ही टीका केली आहे. तुमच्या देशात आजही दहशतवादी फिरत आहेत.

जावेद अख्तर यांनी फैज फेस्टीव्हलमध्ये म्हटले आहे की, आम्ही मुंबईचे लोक आहोत. आम्ही पाहिले आहे की आमच्याशहरावर कसा हल्ला झाला. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून तर आली नाहीत. ते आजही तुमच्या देशात फिरत आहेत.

ही तक्रार जर भारतीयांच्या मनात असेल तर तुम्ही वाईट वाटून घेतले नाही पाहिजे असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

सोशल मिडियावर जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. नेटकरी जावेद अख्तर यांचे कौतुक करत असून याला खरी देशभक्ती म्हणतात असेही काहीजणांनी म्हटले आहे.

दरम्यान, 17 ते 19 फेब्रुवारीला हा फैज फेस्टिव्हल पार पडला. यामध्ये जावेद अख्तर( Javed Akhtar) यांनी मुशायरेमध्ये भाग घेतला होता तसेच त्यांनी आपले नवीन पुस्तकदेखील प्रकाशित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT