Fumio Kishida Dainik Gomantak
ग्लोबल

जपानच्या पंतप्रधानांचा दोन दिवसीय भारत दौरा

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आजपासून 14व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी त्यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावरती असणार आहेत.

दैनिक गोमन्तक

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) आजपासून 14व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी त्यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावरती असणार आहेत. फुमियो किशिदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संवाद साधणार आहेत. शेवटची भारत-जपान वार्षिक शिखर परिषद 2018 साली टोकियो येथे झाली होती. जपानचे (Japan) पंतप्रधान म्हणून किशिदा यांची ही पहिलीच भारत भेट असणार आहे. या शिखर परिषदेमुळे दोन्ही बाजूंना द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि आणखी मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. (Japanese PM's two-day visit to India)

भारत आणि जपान यांच्यात त्यांच्या "विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी" च्या कक्षेत बहुआयामी सहकार्य आहे.

भारत-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी यासाठी दोन्ही बाजूंना विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचे पुनरावलोकन आणि बळकटीकरण तसेच परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची ही शिखर परिषद दोन्ही बाजूंना संधी देईल असे दिसून येत आहे.

जपानच्या पंतप्रधानांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच ऑक्टोबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंनी आमची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT