Japan People Dainik Gomantak
ग्लोबल

'या' देशातील लोकांची ओळख करेल नष्ट विवाह कायदा! प्रत्येकजण विचारेल- तुम्ही कोण आहात?

Manish Jadhav

Japan Could Have Only Sato Surname New Research: जपानमध्ये झालेल्या एका संशोधनानंतर एक अजब दावा करण्यात आला आहे. संशोधनानुसार, विवाहविषयक कायद्यांमध्ये बदल झाला नाही तर एक दिवस जपानमध्ये प्रत्येक व्यक्तीचे सरनेम (आडनाव) एकच असेल. सध्याच्या कायद्यानुसार जोडप्यांना एकच सरनेम ठेवण्याची परवानगी आहे. तोहोकू युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हिरोशी योशिदा यांच्या नेतृत्वाखालील संशोधनाचा अंदाज आहे की, जर जपानने विवाहित जोडप्यांना समान सरनेम निवडण्यासाठी दबाव आणला तर 2531 सालापर्यंत प्रत्येक जपानी व्यक्तीला "सातो-सान" म्हटले जाईल.

दरम्यान, अशा प्रकारची परंपरा रद्द करणाऱ्या जगातील बहुतेक प्रमुख देशांच्या विपरीत, जपान अजूनही कायदेशीररित्या विवाहित जोडप्यांना एकसमान सरनेम ठेवण्याची परवानगी देतो. येथे पत्नी आपल्या पतीचे नाव उपनाव म्हणून जोडते. दुसरीकडे, जपानमध्ये (Japan) अद्याप समलिंगी विवाहाला मान्यता नाही. या नावांमध्ये सर्वात सामान्य नाव 'सतो-सान' आहे.

"लोकांची ओळख नंबरद्वारे केली जाईल"

मार्च 2023 च्या सर्वेक्षणानुसार सातो हे आधीच देशातील सर्वाधिक वापरले जाणारे सरनेम आहे, जे एकूण लोकसंख्येच्या 1.5 टक्के आहे, तर 'सुझुकी' हे सरनेम दुसऱ्या स्थानावर आहे. प्रोफेसर योशिदा म्हणाले की, जर प्रत्येकाने 'सातो' हे सरनेम ठेवले तर त्यांना त्यांच्या नावाने किंवा नंबरने बोलावावे लागेल. ते पुढे म्हणाले की, अशा जगात राहणे शक्य होणार नाही जिथे लोक आपली ओळख गमावतात किंवा एकसारखे होतात. योशिदाचे संशोधन अनेक गृहितकांवर आधारित आहे, जपानमधील विवाह (Marriage) कायद्यावर जपानी संस्कृतीचा किती प्रभाव आहे हे या संशोधनातून निदर्शनास येते.

कोणत्या वर्षी प्रत्येकाचे नाव सरनेम एकसारखे असेल?

प्रोफेसर योशिदा म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचे सरनेम 'सातो' असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर स्वत:ची ओळख करुन देण्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. योशिदा यांच्या अंदाजांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, 2022 ते 2023 या कालावधीत 'सातो' सरनेम असलेल्या जपानी लोकांचे प्रमाण 1.0083 पटीने वाढले. दुसरीकडे मात्र, विवाह कायद्यात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही तर 2446 पर्यंत जवळपास निम्म्याहून अधिक जपानी लोकांचे सरनेम एकसारखे असेल, जे 2531 मध्ये हे प्रमाण 100 टक्के होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhumika Temple: नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भूमिका मंदिराला टाळा कोणी लावला; दोन गट आमने - सामने, हस्तक्षेप न करण्याची सूचना

उत्तर गोव्यातील घरफोड्यांच्या पर्दाफाश, अट्टल चोरासह फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याला अटक; राज्यातील ठळक बातम्या

शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

Ashwem News: अखेर वाद आटोक्यात!! दोन्ही गटांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक

Goa Politics: भाजपचा डिएनए गोंधळला की ते 'आरएसएस'च्या कुबड्या वापरतात; काँग्रेसची वेर्णेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT