Japan Airlines Fire Video Dainik Gomantak
ग्लोबल

Japan Airlines Fire Video: जपानमधील विमान दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू- Reports

Manish Jadhav

Japan Airlines Fire Video: जपानमधील टोकियो हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर मंगळवारी दोन विमानांची टक्कर झाल्यानंतर एका विमानाला भीषण आग लागली. विमानात 379 प्रवासी होते. दोन विमानांपैकी एक विमान जपान एअरलाइन्सचे तर दुसरे विमान तटरक्षक दलाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. जपान एअरलाइन्सच्या विमानात एकूण 379 प्रवासी होते. मात्र, घटनेनंतर लगेचच सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, टक्कर झाल्यानंतर प्रवासी विमानाला आग लागली. प्रवाशांना बाहेर काढेपर्यंत आगीने संपूर्ण विमानाला वेढले. तटरक्षक दलाच्या विमानात एकूण सहा जण होते. मात्र त्यांच्यापैकी, पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, तटरक्षक दलाच्या विमानाचेही मोठे नुकसान झाले आहे.

शिन चिटोस विमानतळावरुन विमानाने उड्डाण केले

दरम्यान, या घटनेची काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये विमानाच्या आत आग पसरताना दिसत आहे. जपानमधील शिन चिटोस विमानतळावरुन विमानाने उड्डाण केले आणि हानेडा येथे पोहोचले. विमानतळावर उतरल्यानंतर धावपट्टीवरच दोन विमानांची टक्कर झाली. या घटनेनंतर जपान एअरलाइन्स आणि विमानतळाचे सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

तटरक्षक दलाच्या विमानात एकूण सहा जण होते

जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, तटरक्षक दलाने म्हटले आहे की, त्यांच्या एका विमानाची हानेडा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाशी टक्कर झाली. हानेडाच्या सी रनवेवर उतरल्यानंतर दोन्ही विमानांमध्ये टक्कर झाल्याचे तटरक्षक दलाने सांगितले. तटरक्षक दलाच्या विमानात एकूण 40 जण होते. यातील पाच जण घटनेनंतर बेपत्ता झाले होते, मात्र त्यांचा शोध लागला आहे.

नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात 72 जणांचा मृत्यू झाला होता

जानेवारी 2023 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात 72 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यात पाच भारतीयांचा समावेश होता. मानवी चुकीमुळे ही घटना घडली होती. 15 जानेवारी 2023 रोजी लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाले. या विमानात एकूण 72 लोक होते, त्यापैकी पाच भारतीय होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT