Jamie McDonald Dainik Gomantak
ग्लोबल

व्वा रे मित्रा! कमालच केली... 6 दिवसांत जगातील 'Seven Wonders' ना भेट

फक्त सहा दिवसांत जगातील सात आश्चर्यांचा प्रवास करून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

Puja Bonkile

Jamie McDonald visits all seven wonders: ब्रिटनमधील 36 वर्षीय जेमी मॅकडोनाल्ड प्रवाशाने नवा विश्वविक्रम केला आहे. फक्त सहा दिवसांत जगातील सात आश्चर्यांचा प्रवास करून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

GWR नुसार, जेमी 'अ‍ॅडव्हेंचरमॅन' मॅकडोनाल्डने 6 दिवस, 16 तास आणि 14 मिनिटांत जगातील सात आश्चर्यांना भेट दिली आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून त्यांनी 6 ते 12 मार्च दरम्यान 36,783 किमी अंतर प्रवास केला आहे. हा एक अनोखा जागतिक विक्रम आहे.

जेमीचा प्रवास 6 मार्च रोजी चीनच्या ग्रेट वॉलपासून सुरू झाला. 7 मार्च रोजी तो ताजमहाल पाहण्यासाठी भारतात आला. त्याने 8 मार्च रोजी जॉर्डनमधील पेट्रा, 9 मार्च रोजी इटलीमधील कोलोझियम, 10 मार्च रोजी ब्राझीलमधील क्राइस्ट द रिडीमर, 11 मार्च रोजी पेरूमधील माचू पिचू आणि शेवटी 12 मार्च रोजी मेक्सिकोमधील चिचेन इत्झा येथे भेट दिली. अहवालानुसार, त्याच्या एका आठवड्याच्या जगाच्या दौऱ्यात जेमीने 13 फ्लाइट, 16 टॅक्सी, 9 बस, 4 ट्रेन आणि एक टोबोगनने प्रवास केला.

  • जेमी एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत होता

रिपोर्ट्सनुसार जेमीची कामगिरी आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे, डॉक्टरांचा असा विश्वास होता की तो तिच्या प्रौढ आयुष्य व्हीलचेअरवर घालवेल. त्याला सिरिंगोमिलिया नावाच्या दुर्मिळ पाठीच्या कण्यातील आजाराने ग्रासले होते. तसेच वयाच्या 9 व्या वर्षापर्यंत तो वारंवार रुग्णालयात जात होता. पण कालांतराने त्याची लक्षणे हळूहळू कमी होत गेली.

  • प्रवासासाठी GWR चे कठोर नियम

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेमीचा हा संपूर्ण प्रवास 'Travelport' या जागतिक तंत्रज्ञान कंपनीने आखला होता. GWR नियमांनुसार प्रवास सुरू केल्यानंतर, त्याला स्वतःहून प्रवास पूर्ण करावा लागला. 

याशिवाय त्याला आणखी काही नियम पाळावे लागले होते. त्यामुळे त्यांने लॉगबुकमध्ये त्यांच्या भटकंतीच्या आठवणी गोळा करायच्या होत्या. सर्व फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचे होते आणि प्रत्येक साइटवर अधिकृत मान्यवरांकडून लेखी निवेदने मिळवायची होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT