Israel-Palestine Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Palestine Conflict: आतंकवादाला पाठिंबा देणाऱ्यांची घरे होणार जमीनदोस्त

Israel Palestine Conflict: अलीकडेच झालेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये इस्त्राइलच्या सात नागरिकांचा मृत्यू झाला असून आणखी पाच नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाइनच्या विरोधात हा कठोर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Israel Palestine Conflict: इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण दिसून येते. आता इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाइनच्या विरोधात दंडात्मक कारवाईची घोषणा केली आहे. त्याबरोबरच इस्त्राइलच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या यहुदी वस्त्यांना मजबूत करण्यसाठी योजना आखल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अलीकडेच झालेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये इस्त्राइलच्या सात नागरिकांचा मृत्यू झाला असून आणखी पाच नागरिक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाइनच्या विरोधात हा कठोर निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

बेंजामिन नेतन्याहूंनी असे म्हटले आहे की, जे लोक आतंकवादाचे समर्थन करतील अशा लोकांची घरे जमीनदोस्त करण्यात येतील. मंत्रीमंडळाच्या समितीने हल्लेखोरांचे घर उध्वस्त करण्यापुर्वी घराला सील करण्याची मंजूरी दिली आहे.

याबरोबरच, हल्लेखोरांच्या घरातील सदस्यांना सामाजिक सुधारणेपासून वंचित राहावे लागणार असल्याची माहिती या समितीने दिली आहे. बेंजामिन नेतन्याहूंनी इस्त्राइल( Israel )च्या नागरिकांना बंदूक बाळगण्यासाठी शक्य होईल तितक्या लवकर परमिट मिळावेआणि अवैध हत्यारे जप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान अमेरिके( USA)चे परराष्ट्र मंत्री  एंटनी ब्लिंकन पुढच्या आठवड्यात इस्त्राइल दौऱ्यावर जाणार होते, बेंजामिन नेतन्याहूंच्या या घोषणेनंतर ते दौऱ्यावर जाणार का? अशा शंका उपस्थितीत केली जात आहे. अमेरिकेने यावर आपली काही प्रतिक्रिया दिली नसली तरीही या मुद्द्यावर अमेरिकेने आपले मत व्यक्त केले आहे.

अमेरिका गोळीबारसारख्या घटनांच्या विरोधात असली तरीही पश्चिमी किनाऱ्यावर यहुदी लोकांच्या वस्त्या निर्माण करण्याला पाठिंबा दर्शवत नसल्याचे अमेरिकेने आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT