Israeli Minister Controversy Dainik Gomantak
ग्लोबल

Israeli Minister Controversy: "ते माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत, रोज 30-40 पॅलेस्टिनींना मारा", इस्त्रायली मंत्र्याच्या प्रक्षोभक वक्तव्यानं खळबळ VIDEO

Israeli Minister Controversial Statement Gaza: गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आणि तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे.

Manish Jadhav

Israeli Minister Controversial Statement Gaza: गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष आणि तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता कराराचे प्रयत्न सुरु असतानाच इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री आणि कट्टरपंथी नेते इतामार बेन-ग्वीर यांनी अत्यंत विवादित आणि प्रक्षोभक वक्तव्य केले. इस्रायली सैन्याने गाझामध्ये दररोज रात्री 30 ते 40 लोकांची थेट हत्या केली पाहिजे, असे विधान त्यांनी एका पॉडकास्ट दरम्यान केले. इतकेच नव्हे तर गाझामध्ये राहणारे पॅलेस्टिनी नागरिक माणूस म्हणवून घेण्याच्याही लायकीचे नाहीत, अशी वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली.

बेन-ग्वीर यांनी स्पष्ट केले की, या हत्या केवळ तात्कालिक धोका असणाऱ्या लोकांपुरत्या मर्यादित नसाव्यात, तर पॅलेस्टिनींना जिवंत राहण्याचाच अधिकार नाही. इस्रायलने गाझावर ताबा मिळवून तिथे ज्यू वस्त्या वसवाव्यात, जेणेकरुन जास्तीत जास्त पॅलेस्टिनींना तो भाग सोडून जाण्यास भाग पाडले जाईल, असा विचार त्यांनी मांडला. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांचा खात्मा करुन संपूर्ण गाझावर इस्रायली वर्चस्व स्थापन करण्याचे समर्थन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट पसरली आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे मध्य पूर्व दूत जेरेड कुशनर यांच्यात गाझा युद्धाच्या शांतता कराराबाबत प्रदीर्घ बैठक पार पडली. अमेरिकेने सादर केलेल्या नवीन योजनेनुसार, हमासने शस्त्रास्त्रे खाली ठेवावीत आणि इस्रायलने टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घ्यावे, असा प्रस्ताव आहे. मात्र, जोपर्यंत हमासचे पूर्णपणे नि:शस्त्रीकरण होत नाही, तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही किंवा गाझाच्या पुनर्निर्माणाला परवानगी देणार नाही, अशी कठोर भूमिका नेतन्याहू यांनी घेतली. मात्र इस्रायली मंत्र्यांच्या अशा चिथावणीखोर विधानांमुळे शांतता प्रक्रियेत अधिक अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT