Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Elon Musk: 'गाझा पट्टीत इंटरनेट...' इस्राइलने दिली एलॉन मस्कला चेतावणी

Israel-Elon Musk: इलॉन मस्कच्या या निर्णयामुळे दळणवळण आणि इंटरनेटचा हमास दहशतवादी कारवायांसाठी वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Israel-Elon Musk: इस्राइल आणि हमासमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत या संघर्षात साडेसात हजारापेक्षा जास्त लोकांनी आपला प्राण गमावला आहे. आता या संघर्षात इतर देश आणि संस्थाचादेखील समावेश होताना दिसत आहे.

गाझा पट्टीतील दळणवळण नेटवर्क नष्ट केल्यानंतर, आपण मोठी लढाई जिंकल्याचा इस्रायलचा विश्वास होता. मात्र गाझा पट्टीतील नेटवर्क पून्हा सुरु करण्याची मनशा इलॉन मस्क यांनी व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

यावर इस्रायलचे दळणवळण मंत्री श्लोमो कारही यांनी इलॉन मस्कच्या या निर्णयामुळे दळणवळण आणि इंटरनेटचा हमास दहशतवादी कारवायांसाठी वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे.

हमास हे आयएसआयएस असल्याचे एलॉन मस्क यांच्यासहित संपूर्ण जगाला माहीत आहे. पुढे ते म्हणतात इलॉन मस्क यांचा हा निर्णय आमची इस्राइलच्या नागरिकांना सोडवण्याच्या हितामध्ये असेल. तोपर्यंत स्टारलिंकबरोबर असलेले सर्व संपर्क तोडत असल्याचे ट्वीट इस्राइलने केले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे खासदार अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ (AOC) यांनी गाझामधील दळणवळण लाइन तोडण्याच्या इस्रायलच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर एलॉन मस्कचे यांनी हा निर्णय घेतला आहे.

अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांनी इस्राइलच्या अशा निर्णयाचा निर्दोष व्यक्तींच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो असे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिका अशा निर्णयाचा निषेध करते असेदेखील त्यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT