'स्वतःच्या सैनिकांना फाशी...', अमेरिकेचा रशियावर मोठा आरोप

जॉन किर्बी यांनी फाशी देणे आणि आपल्याच सैनिकांना जीवे मारण्याची धमकी देणे हे 'रानटीपणा' असल्याचे वर्णन केले आहे. तथापि, आतापर्यंत किती रशियन सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे, याची कोणतीही आकडेवारी त्यांनी दिली नाही.
The National Security Council spokesman John Kirby of US has claimed that Russia is executing its own soldiers.
The National Security Council spokesman John Kirby of US has claimed that Russia is executing its own soldiers.Dainik Gomantak
Published on
Updated on

The National Security Council spokesman John Kirby of US has claimed that Russia is executing its own soldiers:

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दीड वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. दरम्यान, रशिया आपल्याच सैनिकांना फाशीची शिक्षा देत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दावा केला की, आदेशांचे पालन न करणाऱ्या रशियन सैनिकांना मारले जात आहे. युक्रेनियन गोळीबाराला प्रतिसाद न दिल्यास संपूर्ण युनिटला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

जॉन किर्बी यांनी आपल्याच सैनिकांना फाशी देणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे हे 'रानटीपणा' असल्याचे वर्णन केले आहे. तथापि, आतापर्यंत किती रशियन सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे किंवा किती तुकड्यांना धोका आहे याची कोणतीही आकडेवारी त्यांनी दिली नाही.

किर्बी म्हणाले की, रशियाला डॉनबास आणि डोनेस्कमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे. त्यामुळे ते अशा तरुणांना युद्धात उतरवत आहेत ज्यांनी योग्य प्रशिक्षणही घेतलेले नाही.

The National Security Council spokesman John Kirby of US has claimed that Russia is executing its own soldiers.
Afghan Refugees: पाकिस्तान, इराणने मुश्किल केले अफगाण निर्वासितांचे जगणे; पाक लाटतोय कोट्यवधी डॉलर्सची मदत

किर्बी यांनी हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला मदत करण्यासाठी निधी जारी करण्याची परवानगी सभागृहाकडे मागितली आहे. बिडेन यांनी 106 अब्ज डॉलर्सचा निधी जारी करण्याची परवानगी मागितली आहे.

त्याच वेळी, नुकतेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने रशियन सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यांनी रशियन सैन्याच्या ब्रिगेड (2,000 ते 5,000 सैनिक) नष्ट केल्याचा दावा केला.

The National Security Council spokesman John Kirby of US has claimed that Russia is executing its own soldiers.
मुस्लिम देशांपाठोपाठ चीनचा तालिबानशी 'याराना', काय आहे ड्रॅगनचा प्लॅन? वाचा संपूर्ण प्रकरण

24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला 'विशेष लष्करी ऑपरेशन' म्हणत युद्धाची घोषणा केली होती.

युद्धाच्या दोन दिवस आधी पुतिन यांनी डोनेस्तक आणि डॉनबासचे लुहान्स्क यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले होते. या युद्धापूर्वी युक्रेनला नाटो या लष्करी संघटनेत सामील व्हायचे होते. पुतिन यांनी याबाबत इशारा दिला होता.

या युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेन सरकारच्या म्हणण्यानुसार, 24 फेब्रुवारी 2022 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान 16,500 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. 13 हजारांहून अधिक युक्रेनचे सैनिकही मरण पावले आहेत.

त्याच वेळी, वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 फेब्रुवारी 2022 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत रशियन सैन्याच्या साडेतीन हजार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com