Israeli Family Dainik Gomantak
ग्लोबल

WATCH: हमासच्या दहशतवाद्यांची 'क्रूरता', इस्रायली जोडप्यासमोर मुलीला टाकले मारुन; व्हिडिओ

Hamas-Israel News: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.

Manish Jadhav

Hamas-Israel News: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.

यामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हमासचे सशस्त्र दहशतवादी कथितरित्या एका इस्रायली कुटुंबाला ओलीस ठेवताना दिसत आहेत.

दरम्यान, कुटुंबासमोर मुलीची हत्या केली जाते. इस्रायलमध्ये हमास मोठ्या प्रमाणावर नरसंहार करत असल्याचे अमेरिकेतील इस्रायली दूतावासाने म्हटले आहे. दहशतवाद्यांनी 100 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इस्रायलस्थित पत्रकार इंडिया नफ्ताली यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपे आपल्या मुला आणि मुलीसोबत जमिनीवर बसलेले दिसत आहे. मुले अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ खूपच हृदयस्पर्शी आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे

व्हिडिओमध्ये हे जोडपे आणि त्यांची मुले दिसत आहेत. यावेळी मुलगा वडिलांना वितारतो की, बाबा, तुमच्या हाताला कुणाचे रक्त लागले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी म्हणते की- मला वाटते की माझी बहीण जिवंत असावी, परंतु त्यांनी माझ्यासमोर तिला मारुन टाकले.

दरम्यान, आई-वडिल मुलांचे सांत्वन करताना दिसत आहेत. आई-वडिल त्यांना झोपण्यास सांगतात कारण दहशतवादी (Terrorist) त्यांच्या घराबाहेर गोळीबार करत असतील.

अचानक एक व्यक्ती कॅमेरा घेऊन घरात पोहोचली, पण घर रिकामे असल्याचे त्याला जाणवले. त्याचा चेहरा दिसत नव्हता. मात्र, त्याच्या खांद्यावर बंदूक असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नफ्ताली यांनी पोस्टमध्ये म्हटले की...

नफ्ताली या व्हिडिओवरील पोस्टमध्ये लिहितात, "एका इस्रायली कुटुंबाला ओलिस ठेवत असताना कॅमेऱ्यासमोर हमासच्या दहशतवाद्यांची क्रूरता दिसली. एका मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, हे पाहून तिच्या भावंडांना धक्का बसला. ही क्रूरता आहे. जगाला हे जाणून घेण्याची गरज आहे."

दुसरीकडे, हमासने केलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पहिल्या तासात अपहरण आणि ओलीस ठेवण्याच्या घटना घडल्या. दहशतवाद्यांनी पॅराग्लायडर आणि बुलडोझरद्वारे इस्रायलमध्ये घुसखोरी केली.

सोशल मीडियावरील (Social Media) अनेक ग्राफिक दृश्यांमध्ये जखमी इस्रायली सैनिक आणि नागरिकांना हात बांधून हमासच्या वाहनांमध्ये जबरदस्तीने बसवले जात असल्याचे दिसून आले. एका व्हिडिओमध्ये हमासचे दहशतवादी एका महिलेच्या मृतदेहाला लाथ मारताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 September 2025: नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल, कामाच्या ठिकाणी कौतुक होईल;प्रवासात यश

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

SCROLL FOR NEXT