Israel Lebanon Map Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Israel Lebanon Ceasefire Map 2026: लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात अधिकृतरित्या युद्धविराम झाला असला, तरी सीमाभागातील तणाव अद्याप कायम आहे.

Manish Jadhav

Israel Lebanon Ceasefire Map 2026: लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात अधिकृतरित्या युद्धविराम झाला असला, तरी सीमाभागातील तणाव अद्याप कायम आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षानंतर आता लेबनॉन-इस्रायल सीमेवरुन एक मोठी बातमी समोर आली. इस्रायली सैन्याने पहिल्यांदाच एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला असून यामध्ये लेबनॉनचा मोठा भूभाग इस्रायलच्या नियंत्रणाखाली असल्याचे दाखवण्यात आले. हा नकाशा समोर आल्यानंतर मध्य-पूर्वेतील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून इस्रायलने आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी लेबनॉनच्या हद्दीत 'बफर झोन' तयार केल्याचे स्पष्ट झाले.

इस्रायली सैन्याने प्रसिद्ध केलेल्या या नकाशात सीमेजवळील लेबनॉनची डझनाभर गावे दाखवण्यात आली आहेत, जी सध्या इस्रायलच्या लष्करी नियंत्रणाखाली आहेत. ही गावे प्रामुख्याने रिकामी असून इस्रायली सैन्याने येथील अनेक इमारती आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत. नकाशातील 'डिप्लॉयमेंट लाईन' पूर्व ते पश्चिम अशी पसरलेली असून ती लेबनॉनच्या हद्दीत 5 ते 10 किलोमीटर खोलवर गेली आहे. उत्तर इस्रायलमधील शहरांना हिजबुल्लाच्या रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी इस्रायलने हे पाऊल उचलले आहे. या भागातील गावे उद्ध्वस्त करण्यामागचा मुख्य उद्देश हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना इस्रायलच्या सीमेजवळ लपण्यासाठी कोणतीही जागा उरु नये, हा आहे.

इस्रायलने (Israel) यापूर्वी गाझा आणि सीरियामध्येही अशाच प्रकारचे 'बफर झोन' तयार केले आहेत. या धोरणामुळे इस्रायलला आपल्या शत्रू राष्ट्रांच्या सीमेवर एक संरक्षक भिंत तयार करता येते, जिथे लष्कराचे पूर्ण नियंत्रण असते. युद्धविराम करारावर सहमती झाल्यानंतर सध्या दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष गोळीबार थांबला असला, तरी इस्रायलने ज्या प्रकारे नकाशा जारी करुन लेबनॉनच्या जमिनीवर आपला हक्क किंवा नियंत्रण दर्शवले, ते पाहता भविष्यात हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेबनॉन सरकारने या नकाशावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी स्थानिक नागरिकांमध्ये आपल्या जमिनी गमावल्याची मोठी भीती निर्माण झाली.

एकूणच, लेबनॉन (Lebanon) आणि इस्रायलमधील हा युद्धविराम केवळ तात्पुरती शांतता ठरते की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. इस्रायलची ही नवी रणनीती हिजबुल्लाला रोखण्यासाठी प्रभावी ठरेल असा दावा इस्रायली संरक्षण दलाकडून केला जात आहे. मात्र, दुसऱ्या देशाच्या सार्वभौम भूभागावर अशा प्रकारे ताबा मिळवणे आणि तो नकाशाद्वारे जाहीर करणे, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ओव्हरस्पीडिंगचा थरार! वळणावर नियंत्रण सुटलं अन् तोंड फुटलं, बाईकस्वाराचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही बघितलात का?

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

SCROLL FOR NEXT