गाझामध्ये इस्रायली लष्कराचा क्रूरपणा थांबायचं नाव घेत नाहीये. हमासच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, गाझा शहरातील मृतांची संख्या 30 हजारांच्या पुढे गेली आहे. गाझामधील निरपराध लोकांवरील इस्रायली सैन्याची क्रूरता कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. ताज्या प्रकरणात लोक शहरात अन्नासाठी रांगेत उभे होते, मदत घेऊन येणाऱ्या ट्रकची वाट पाहत होते. यादरम्यान इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 104 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, गाझामधील पॅलेस्टिनींवर झालेल्या ताज्या हल्ल्याबाबत इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्या ठिकाणी गोळीबार झाल्याची कोणतीही माहिती नाही. उत्तर गाझामध्ये मदतीचा ट्रक आल्यावर चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे डझनभर लोक जखमी झाले. तथापि, एका इस्रायली सूत्राने सांगितले की, सैनिकांनी गर्दीतील त्या लोकांना निशाणा बनवले, ज्यांच्यापासून त्यांना धोका होता.
पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या कार्यालयाने सांगितले की, "आज सकाळी इस्रायली सैन्याने नबुलसी चौकात मदत घेऊन येणाऱ्या ट्रकची वाट पाहत असलेल्या लोकांवर केलेल्या भीषण हल्ल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही या हत्याकांडाचा निषेध करतो". गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी सांगितले की, ही घटना गाझा शहराच्या पश्चिमेला, एनक्लेव्हच्या उत्तरेकडील भागात अल-नबुसी चौकात घडली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.