Inbar Lieberman Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: 25 वर्षीय इनबार लिबरमॅन ठरली हमासच्या दहशतवाद्यांचा 'कर्दनकाळ', हल्ल्यात 24 दहशतवादी ठार!

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरुच आहे. गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून 1000 हून अधिक लोकांची हत्या केली, पण 25 वर्षीय इनबार लिबरमॅनच्या प्रत्युत्तराला हमासच्या दहशतवाद्यांकडे उत्तर नव्हते.

इनबार लिबरमॅनने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत हमासच्या हल्ल्यापासून आपल्या समुदायाला वाचवलेच नाही तर हमासच्या दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

एकट्या लिबरमॅनने यापैकी पाच जणांना ठार केले. लीबरमॅनची तिच्या या शौर्यासाठी जगभरात चर्चा होत असून इस्त्रायली लोकांच्या नजरेत ती 'हिरो' म्हणून पुढे आली आहे.

लीबरमॅनने आपल्या सहकाऱ्यांसह दहशतवाद्यांशी मुकाबला केला

दरम्यान, इनबार ही गाझा पट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या किबुत्ज नीर आमची सुरक्षा समन्वयक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताच इनबारला स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटांचा आवाज ऐकताच इनबार सावध झाली आणि तिने ताबडतोब 12 सहकाऱ्यांच्या सुरक्षा पथकासह हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाली.

इनबारने आपले शौर्य आणि शहाणपणा दाखवत आपल्या साथीदारांना सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आघाड्यांवर तैनात केले आणि हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी किबुत्ज नीर आमवर हल्ला करताच, इनबार आणि त्यांच्या टीमने चार तास दहशतवाद्यांशी धैर्याने मुकाबला केला आणि दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

दुसरीकडे, दहशतवाद्यांनी निर आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये नरसंहार केला आणि शेकडो लोकांना ठार केले, पण दहशतवाद्यांना (Terrorists) निर आममध्ये कोणतेही नुकसान करता आले नाही. इनबार लिबरमॅनच्या शौर्याची इस्त्रायली सोशल मीडियावरही चर्चा होत असून इस्त्रायली सरकारने लिबरमॅनचा सन्मान करावा अशी मागणी लोक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT