israel hamas war in gaza shared teeth bones of children burnt  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांना जाळून मारले, इस्रायलने दातांचे फोटो केले शेअर

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. युद्धग्रस्त भागातून दररोज हृदयद्रावक घटना समोर येत आहेत.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. युद्धग्रस्त भागातून दररोज हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. दरम्यान, इस्रायलने आज असे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.

या युद्धात किती निष्पाप जीवांचा मृत्यू झाला आहे हे या फोटोंवरुन दिसून येते. युद्धाच्या क्रूरतेपासून लहान मुलेही कशी सुटलेली नाहीत हे दाखवण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत. इस्रायलने ट्विटरवर हे फोटो शेअर केली असून हमासने मुलांना जाळून मारल्याचा दावा केला आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी बिअरीमध्ये लहान मुलांवर अत्याचार केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलने असेही लिहिले आहे की, हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करुन त्यांना जाळले.

फोटो शेअर करताना इस्रायलने लिहिले आहे की, बिअरीमध्ये प्राण गमावलेल्या मुलांचे दात ढिगाऱ्याखाली दबलेले आढळले.

इस्रायलने X वर काय लिहिले आहे?

दरम्यान, मुलांची हाडे आणि दात असलेले 4 फोटो शेअर करताना इस्रायलने X वर ह्रदयद्रावक कॅप्शन लिहिले. हे सर्व बिअरीमध्ये मृत्यू झालेल्या मुलांचे अवशेष आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी (Terrorists) त्यांचा छळ केला, त्यांचे शरीराचे तुकडे केले आणि नंतर जाळले.

Israel-Hamas War

दुसरीकडे, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धाला आज 26 दिवस झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे 1400 इस्रायलचे लोक मारले गेले आहेत.

युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत आहे. इस्रायल (Israel) गाझामधील हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मंगळवारी इस्रायलने गाझातील सर्वात मोठे निर्वासित शिबिर असलेल्या जबालियावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये हमास कमांडर इब्राहिम बियारीसह सुमारे 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला.

तसेच, इस्रायलच्या बॉम्बफेकीमुळे वाढत्या मानवतावादी संकटाचा सामना करणार्‍या गाझातील लोकांसाठी धार्मिक, नैतिक, मानवतावादी आणि राष्ट्रीय जबाबदारीच्या भावनेतून हे हवाई हल्ले करण्यात आले, असे द टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.

मंगळवारी इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हौथी संघटनेने इलियट शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता, जो हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT