Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायली सैन्याने रुग्णालयांना केले लक्ष्य; दर 10 मिनिटाला नवजात बालकाचा होतोय मृत्यू

Gaza's Al-Shifa Hospital out of Service as Fuel Runs Out: हमास या दहशतवादी संघटनेशी एकहाती युद्ध लढणाऱ्या इस्रायली लष्कराने आता रुग्णालयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. यातच आता, हमास या दहशतवादी संघटनेशी एकहाती युद्ध लढणाऱ्या इस्रायली लष्कराने रुग्णालयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

या रुग्णालयांचे अड्ड्यांमध्ये रुपांतर करुन, हमासचे दहशतवादी त्यांचा ढाल म्हणून वापर करत आहेत. त्याच दाव्यासह झालेल्या हल्ल्यानंतर, गाझा पट्टीच्या अल-शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये इंधन संपले आणि इनक्यूबेटरमध्ये दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला. याशिवाय, आणखी 37 जणांना धोका आहे.

रामल्लाहस्थित पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ ए-केद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराने रुग्णालयातील इनक्यूबेटर्सची वीज खंडित केली, त्यानंतर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. "इंधन संपुष्टात आल्याने तसेच इस्रायली हल्ल्यामुळे अल-शिफा मेडिकल कॉम्प्लेक्सचे सर्व विभाग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत," असे अश्रफ अल-केद्रा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

48 तासांत तीन हॉस्पिटलमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे

दरम्यान, 48 तासांत गाझामधील तीन रुग्णालयांवर (Hospital) झालेल्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी सांगितले होते की, इस्रायली हवाई हल्ल्यामुळे रुग्णालयाची ऑक्सिजन पुरवठा लाइन नष्ट झाली, ज्यामुळे येथे दाखल लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

याशिवाय, इस्रायलचे ड्रोन रुग्णालयांनाही लक्ष्य करत आहेत, असा अहवाल पॅलेस्टिनी सुरक्षा सूत्रांनी शनिवारी दिला. त्यांच्या बाजूने असे सांगण्यात आले की, दहशतवाद्यांसोबतच्या संघर्षात इस्रायली सैन्याने 1946 मध्ये स्थापन झालेल्या अल-शिफा रुग्णालयाला वेढा घातला आहे.

IDF ने 1 हजार लोकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला होता

दुसरीकडे, शुक्रवारीच जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, गाझा पट्टीमध्ये दर 10 मिनिटांनी एका मुलाचा मृत्यू होत आहे.

गाझातील 36 रुग्णालयांपैकी जवळपास निम्मी रुग्णालये आणि दोन तृतीयांश पीएचसी उपचार देत नाहीत आणि जिथे उपचार दिले जात आहेत, तिथे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल केले जात असल्याचेही त्यांनी सांगण्यात आले.

दुसरीकडे, इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या दाव्यावर नजर टाकली तर, रान्तिसी हॉस्पिटलमध्ये गाझातील सुमारे 1 हजार लोकांना ओलीस ठेवणारा हमासच्या नासेर रदवान कंपनीचा कमांडर अहमद सियाम याला लष्कराने ठार केले आहे.

घेब्रेयसस यांना एक जुनी घटना आठवली

इथिओपियातील युद्धात वाढलेल्या टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी जुनी घटना आठवून गाझातील लहान मुलांची काय स्थिती असेल याची कल्पना केली. 'हवेत स्फोटांचा आवाजा, त्यानंतर उठणारे धुराचे लोट, या गोष्टी आयुष्यभर आपल्या लक्षात राहतील, असे घेब्रेयसस म्हणाले. घेब्रेयसस पुढे म्हणाले की, 7 ऑक्टोबरपासून इस्रायलमध्ये आरोग्य सेवांवर 25 हल्ले झाले आहेत.

दुसरीकडे, इस्रायलचे (Israel) संयुक्त राष्ट्राचे राजदूत गिलाड एर्डन यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले की, इस्रायलने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यापूर्वी गाझामधील सुमारे 1.1 दशलक्ष लोकांना दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: चक दे इंडिया...! पाकड्यांना नमवत 'सूर्या ब्रिगेड'ने नवव्यांदा कोरलं आशिया चषकावर नाव, तिलक-शिवमने धू धू धूतलं

Asia Cup 2025 Final: फायनल सामन्यात पुन्हा राडा! पाकिस्तानी ओपनरवर भडकला 'जस्सी'; तुम्हीच बघा काय घडलं? VIDEO

Asia Cup 2025 Final: फायनलमध्ये बुमराहचा स्वॅग! 'ती' विकेट घेऊन सेलिब्रेशनने काढला राग; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल VIDEO

Asia Cup 2025 Final: कुलदीप यादवनं रचला इतिहास! लसिथ मलिंगाचा मोडला मोठा रेकॉर्ड; पाकिस्तानी फलंदाजांना केलं ढेर VIDEO

जीवनात अडचणी येतायत? बृहस्पतीला करा प्रसन्न, होतील मनोकामना पूर्ण; सौभाग्य आणि समृद्धीसाठी करा 'हे' विशेष उपाय

SCROLL FOR NEXT