Al Shifa Hospital  
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायली लष्कराने दिला एक तासाचा अल्टिमेटम, गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयात चेंगराचेंगरी

Al Shifa Hospital: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. यातच आता, इस्रायली लष्कराने गाझाचे मुख्य रुग्णालय अल शिफा खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर तिथे चेंगराचेंगरी झाली. 2,000 हून अधिक रुग्ण रुग्णालयात अडकले होते.

तथापि, एएफपी न्यूज एजन्सीनुसार, गाझाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की 450 रुग्ण रुग्णालयात राहिले आहेत. हमास येथून आपल्या दहशतवादी कारवाया करत असल्याचा दावा करुन इस्रायल रुग्णालयाच्या आत लष्करी कारवाया करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, हमासने हा आरोप फेटाळून लावला आहे.

रुग्णालय खाली करण्याचे आदेश

एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायल सैन्याने लाऊडस्पीकरवरुन पुढील एका तासात अल-शिफा रुग्णालय खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

रुग्णालयाचे (Hospital) संचालक मोहम्मद अबू सलमिया यांनी रुग्ण, जखमी, विस्थापित लोक आणि वैद्यकीय कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आल्याची खात्री करावी आणि त्यांनी पायीच समुद्रकिनाऱ्याकडे जावे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, अल-शिफामध्ये 2,300 रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापित पॅलेस्टिनी राहत होते.

जीवघेणे हल्ले सुरुच आहेत

एका निवेदनात, इस्रायलने (Israel) पॅलेस्टिनींना त्यांच्या स्वत: च्या सुरक्षिततेसाठी गाझाच्या उत्तरेकडे जाण्यास सांगितले. कारण या प्रदेशाच्या मध्य आणि दक्षिण भागात प्राणघातक हवाई हल्ले सुरुच आहेत.

इस्रायलने सांगितले की, आतापर्यंत सुमारे 1,200 लोक मारले गेले, त्यापैकी बहुतेक नागरिक होते आणि सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आले. गाझामध्ये आतापर्यंत 5,000 मुलांसह सुमारे 12,000 लोक मारले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Ranji Trophy: 6 बाद 84 वरुन गोव्याचे शानदार कमबॅक! दर्शन-यशची शतकी भागीदारी; पहिल्या दिवसाअखेर संघाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT