Israel PM Benjamin Netanyahu  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझा ताब्यात घेण्याबाबत इस्रायलचा प्लॅन काय? नेतन्याहू म्हणाले...

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला तीन महिने उलटून गेले असले तरी हे युद्ध थांबताना दिसत नाहीये.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला तीन महिने उलटून गेले असले तरी हे युद्ध अद्याप थांबताना दिसत नाहीये. हिजबुल्ला आणि हुथी बंडखोर हमासच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आल्यानंतरही इस्रायलचे गाझावरील हल्ले थांबत नाहीत. इस्रायली लष्कर आता हमासच्या ठिकाणांना अधिक लक्ष्य करत कारवाई करत आहे. या युद्धादरम्यान, गाझावरील हल्ल्यानंतर इस्रायल तिथल्या लोकांना हुसकावून लावणार का? त्यांच्या भूमीवर कायमचा कब्जा करणार का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांच्या पार्श्‍वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आता गाझाच्या ताब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, नेतन्याहू यांनी इंग्रजीमध्ये एक व्हिडिओ जारी केला असून, गाझावर कायमचा कब्जा करण्याचा इस्रायलचा कोणताही विचार नाही. आम्हाला तिथे राहणाऱ्या लोकांना कायमचे विस्थापित करायचे नाही. नेतन्याहू यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबत सुरु झालेल्या नव्या तणावानंतर इस्रायलने हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर, गाझावरील इस्रायलच्या कारवाईविरोधात दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) धाव घेतली आहे. ICJ मध्ये दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहार केल्याचा आरोप केला आहे.

नेतन्याहू म्हणाले - हमासला आणखी मृत्यू हवे आहेत

नेतन्याहू यांनी एक व्हिडिओ जारी केला असून, गाझावर कायमस्वरुपी कब्जा करण्याचा किंवा तेथील नागरिकांना विस्थापित करण्याचा इस्रायलचा कोणताही हेतू नाही. इस्रायल पॅलेस्टिनी लोकांशी नाही तर हमासच्या दहशतवाद्यांशी लढत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, IDF ने पत्रके, इशारे आणि सुरक्षित कॉरिडॉर तयार करुन पॅलेस्टिनी मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हमासने केवळ पॅलेस्टिनींच्या मृत्यूची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला.

तर 23 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे

इस्त्रायली हल्ल्यात आतापर्यंत 23 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 58 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 23 लाख लोक बेघर झाले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचा पलटवार सुरु आहे, जो हमासचा खात्मा केल्यानंतरच संपणार आहे. दुसरीकडे, इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये हमासची कमांड स्ट्रक्चर उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

SCROLL FOR NEXT