Houthi Rebels Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमास-हिजबुल्लाहनंतर आता हौथींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्ध सुरु होऊन 25 दिवस झाले आहेत. आज युद्धाचा 26 वा दिवस आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्ध सुरु होऊन 25 दिवस झाले आहेत. आज युद्धाचा 26 वा दिवस आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हमासशिवाय लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाह इस्त्रायलविरुद्ध लढत आहे.

आता येमेनमधील अतिरेकी संघटना हौथीनेही इस्रायलविरोधात मोर्चा खोलला आहे. हौथी बंडखोरांनी अधिकृतपणे इस्रायलविरुद्ध आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने युद्ध घोषित केले आहे.

हौथी बंडखोर सरकारचे पंतप्रधान अझीझ बिन हबुतर म्हणाले की, आम्ही आमच्या लोकांना गाझामध्ये मरण्यासाठी सोडू शकत नाही. गाझामध्ये युद्धविराम न झाल्यास इस्रायलवर आणखी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी हौथी बंडखोरांनी दिली आहे. 2014 मध्ये हौथींनी येमेनच्या राजधानीसह देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला.

दरम्यान, इस्रायलच्या (Israel) बॉम्बफेकीमुळे वाढत्या मानवतावादी संकटाचा सामना करणार्‍या गाझातील लोकांसाठी धार्मिक, नैतिक, मानवतावादी आणि राष्ट्रीय जबाबदारीच्या भावनेतून हे हवाई हल्ले करण्यात आले, असे द टाईम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले आहे.

मंगळवारी इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हौथी संघटनेने इलियट शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता, जो हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला.

हौथी बंडखोर कोण आहेत?

हौथी ही शिया मुस्लिमांची सर्वात मोठी दहशतवादी संघटना आहे. 1980 च्या दशकात हौथीने येमेनला आपले कार्यक्षेत्र बनवले. अब्दुल्ला सालेहच्या आर्थिक धोरणांवर हौथी संतापले, ज्यामुळे येमेनच्या उत्तरेकडील प्रदेशात असमानता वाढली.

2000 मध्ये, हौथींनी याच्या निषेधार्थ नागरी सैन्याची स्थापना केली. 2004 ते 2010 दरम्यान अब्दुल्ला सालेहच्या सैन्यासोबत हौथींनी सहा युद्धे केली. तथापि, नंतर 2011 मध्ये अरबांच्या हस्तक्षेपामुळे ते थांबले आणि सुमारे दोन वर्षे चर्चा सुरु राहिली, परंतु कोणताही तोडगा निघाला नाही.

हौथी बंडखोर किती शक्तिशाली आहेत?

हौथी बंडखोर इस्रायलचे किती नुकसान करु शकतात? हे जाणून घेण्यासाठी हौथी बंडखोरांची ताकद जाणून घेतली पाहिजे. हौथी बंडखोरांकडे सैनिक टँक, अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्रे (Missiles), लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. मंगळवारी हौथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्राने हल्ला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT