Israel–Hamas war 2023 Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas Conflict: हमासच्या ताब्यातील ६० हून अधिक ओलीस गायब

Israel-Hamas Conflict: बेपत्ता झालेल्या 60 इस्रायली ओलीसांपैकी 23 मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

दैनिक गोमन्तक

Israel-Hamas Conflict: इस्राइल-हमास संघर्ष दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या संघर्षात आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हमासने इस्राइलवर अचानक हल्ले करुन इस्राइलच्या नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्राइलने युद्ध घोषित केले आहे.

पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या लष्करी शाखेने शनिवारी सांगितले की गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे 60 हून अधिक ओलीस बेपत्ता झाले आहेत. अल-कासम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी हमासच्या टेलिग्राम खात्यावर सांगितले की, बेपत्ता झालेल्या 60 इस्रायली ओलीसांपैकी 23 मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

त्याच वेळी, पॅलेस्टिनी वृत्तसंस्थेने गाझा निर्वासित छावणीवर इस्रायली बॉम्बहल्ल्यात 51 लोक मारले गेले, ज्यात मुख्यतः मुले आणि महिलांचा समावेश असल्याची माहीती दिली आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत 9 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

दरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी हे युद्ध आत्ताच थांबणार नाही. जोपर्यंत इस्राइलच्या नागरिकांना सोडवत नाही तोपर्यंत हे युद्ध चालूच राहणार आहे. गाझा पट्टीतील दळणवळण, इंटरनेट बंद केले आणि इंधन याचा पुरवठा बंद केला जाईल असे म्हटले आहे.

संपूर्ण जगभरातून हे युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संयुक्त राष्ट्रानेदेखील हे युद्ध थांबावावे असे आवाहन केले आहे. आता हा संघर्ष कधी थांबणार आणि यामध्ये किती नागरिकांना आपला प्राण गमवावा लागणार याची चिंता संपूर्ण जगाला लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT