Israel–Hamas war 2023 Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas Conflict: इस्राइल-हमास संघर्षात निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ, शरणार्थी शिबिरावर पडलेल्या बॉम्बमुळे 50 जण ठार

Israel-Hamas: उत्तर गाझा येथील जबलिया शरणार्थी शिबिरात हा स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

Israel-Hamas: इस्राइल-हमास संघर्षात अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागत आहे. आता उत्तर गाझामध्ये शरणार्थी शिबिरात स्फोट झाला असून त्यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे.

उत्तर गाझा येथील जबलिया शरणार्थी शिबिरात हा स्फोट झाला. गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार, इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून लोकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड यांनी या स्पोटानंतर वक्तव्य केले आहे. गाझामधील निर्वासित शिबिरातील खरे लक्ष्य हमास कमांडर होते. नेहमीप्रमाणे ते नागरिकांच्या मागे लपतात.

या हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल विचारले असता त्यांनी हेच उत्तर दिले की ही युद्धाची शोकांतिका आहे. त्यांनी पुन्हा एकदा हमास( Hamas )शी संबंधित नसलेल्या नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र परिषदेत इस्राइल( Israel )-हमासमधील संघर्ष आता सिरियामध्येदेखील पसरत असल्याचे वक्तव्य सिरियाच्या प्रतिनिधींकडून कऱण्यात आले आहे. आता हा संघर्ष कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT