Israel Drone Attack Video Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Israel Drone Attack Video: इस्त्रायलने सीरियाच्या राजधानी दमास्कसवर ड्रोन हल्ले करत रक्षा मंत्रालय आणि सैन्य मुख्यालयाला लक्ष्य केले.

Manish Jadhav

इस्त्रायलने सीरियाच्या राजधानी दमास्कसवर ड्रोन हल्ले करत रक्षा मंत्रालय आणि सैन्य मुख्यालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यांमुळे संपूर्ण दमास्कस शहर धुराच्या लोटाने झाकोळले असून, अनेक स्फोटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये तर, हल्ल्याच्या वेळी एका टीव्ही चॅनलवरील लाइव्ह कार्यक्रमात अँकरला कार्यक्रम सोडून धावताना पाहिले गेले.

आधी हा व्हिडिओ पाहा!इस्त्रायली लष्कराने काय म्हटले?

इस्त्रायलने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. 'टाइम्स ऑफ इस्त्रायल'च्या रिपोर्टनुसार, आयडीएफ (IDF - इजराइल डिफेंस फोर्स) ने म्हटले आहे की, बुधवार रोजी दमास्कसमधील सीरियाच्या जनरल स्टाफ कमांड बिल्डिंग आणि सीरियन राष्ट्रपती भवनाजवळच्या आणखी एका लष्करी ठिकाणावर मोठे हल्ले करण्यात आले. हे हल्ले 'ड्रूज' समुदायावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केल्याचे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

आयडीएफनुसार, या ताज्या हल्ल्यांमुळे सीरियन रणगाडे (टँक), रॉकेट लाँचर आणि मशीनगनने सज्ज पिकअप ट्रक, जे दक्षिण सीरियातील 'ड्रूज' बहुल शहर स्वेदा (Sweida) कडे जात होते, त्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात सीरियाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयडीएफने म्हटले आहे की, ते दक्षिण सीरियातील 'ड्रूज' नागरिकांविरोधी हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

इस्त्रायली लष्कराने काय म्हटले?

'टाइम्स ऑफ इस्त्रायल'च्या रिपोर्टनुसार, आयडीएफ (IDF - इजराइल डिफेंस फोर्स) ने म्हटले की, बुधवार (16 जुलै) दमास्कसमधील सीरियाच्या जनरल स्टाफ कमांड बिल्डिंग आणि सीरियन राष्ट्रपती भवनाजवळच्या आणखी एका लष्करी ठिकाणावर मोठे हल्ले करण्यात आले. हे हल्ले 'ड्रूज'वर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केल्याचे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

आयडीएफनुसार, या ताज्या हल्ल्यांमुळे सीरियन रणगाडे (टँक), रॉकेट लाँचर आणि मशीनगनने सज्ज पिकअप ट्रक, जे दक्षिण सीरियातील 'ड्रूज' बहुल शहर स्वेदा (Sweida) कडे जात होते, त्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात सीरियाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आयडीएफने म्हटले की, ते दक्षिण सीरियातील 'ड्रूज' नागरिकांविरोधी हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

'आयडीएफ आपल्या ड्रूज बांधवांसोबत'

इस्त्रायली लष्कराने सांगितले की, त्यांनी गोलान हाइट्समध्ये 2 डिव्हिजन तैनात करण्यासोबतच ड्रोन आणि लढाऊ विमानांसह हवाई दल पाठवण्याची तयारी केली आहे. हे अतिरिक्त सैन्य सीमेवरील आणि बफर झोनमधील 210 व्या बाशान डिव्हिजनला (Bashan Division) मजबूत करतील. आयडीएफने स्पष्ट केले की, 'आम्ही आमच्या ड्रूज बांधवांसोबत आहोत. त्यामुळे, त्यांना वाचवण्यासाठी जिथे आवश्यक असेल, तिथे आम्ही संपूर्ण सीरियामध्ये हल्ले करत आहोत.'

या हल्ल्यांमुळे इस्त्रायल आणि सीरिया यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून या घटनेचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस महाशुभयोगाचा! 'या' 5 भाग्यवान राशींवर राहणार बजरंगबलीची कृपादृष्टी, धनालाभासह मिळणार नशिबाचीही साथ

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

SCROLL FOR NEXT