Israel Syria Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Israel Attacks on Syria's Defense Ministry: इस्त्रायलने सीरियाच्या संरक्षण मंत्रालय आणि सैन्य मुख्यालयावर ड्रोन आणि बॉम्ब हल्ले केले आहेत.

Manish Jadhav

Israel Attacks on Syria's Defense Ministry: इस्त्रायलने सीरियाच्या संरक्षण मंत्रालय आणि सैन्य मुख्यालयावर ड्रोन आणि बॉम्ब हल्ले केले आहेत. या भीषण हल्ल्यांमुळे सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये धुराचे मोठे लोट आकाशात दिसत आहेत. इस्त्रायलने या हल्ल्याची पुष्टी केली असून, 'टाइम्स ऑफ इस्त्रायल'नुसार, आयडीएफ (IDF - इजराइल डिफेंस फोर्स) ने 'ड्रूज' वर होणाऱ्या हल्ल्याचा बदला घेतला आहे.

आयडीएफच्या जवानांनी थेट दमास्कसमधील सैन्य मुख्यालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ला केला, ज्यात दोन्ही इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे इस्त्रायल आणि सीरियामध्ये युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हल्ल्याचे कारण आणि ठिकाण

इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे युद्धाचे ठिकाण बदलले आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. मंगळवारी (15 जुलै) 'ड्रूज' मुद्द्यावर इस्त्रायल आणि सीरियामध्ये (Syria) एक करार झाला होता, परंतु 24 तासांच्या आतच इस्त्रायलने हा हल्ला केला. सीरियन लष्कराच्या मते, इस्त्रायली ड्रोनने दमास्कसच्या उमय्यद स्क्वेअरच्या आसपास हल्ला केला. या हल्ल्यामुळे सीरियाचे किती नुकसान झाले आहे, याचे आकलन अद्याप झालेले नाही. मात्र, काही लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हल्ल्यावेळी नेतन्याहू कोर्टात

इस्त्रायली मीडियानुसार, जेव्हा इस्त्रायल डिफेन्स फोर्सचे जवान दमास्कसवर हल्ला करत होते, त्यावेळी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तेल अवीव येथील एका कोर्टात होते. नेतन्याहू 'कतरगेट' (Qatargate) प्रकरणात साक्ष देण्यासाठी कोर्टात आले होते.

रिपोर्टनुसार, न्यायाधीशांना दमास्कसवरील हल्ल्याची बातमी मिळताच, त्यांनी तातडीने कार्यवाही स्थगित केली. त्यानंतर नेतन्याहू तात्काळ 'वॉर रुम' मध्ये बैठक घेण्यासाठी रवाना झाले. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्त्रायल (Israel) आणि सीरिया यांच्यातील संबंध आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मुंगूल गोळीबार प्रकरण; प्राथमिक तपासात दोन टोळ्यांमधील गोळी युद्ध असल्याचे स्पष्ट

Stray Dog Bytes: फोंड्यात भटक्या कुत्र्यांनी 5 जणांचे घेतले चावे! लोक भयभीत; महिन्याकाठी 100 जणांवर हल्ला

Goa Crime: सावधान! तोतया अधिकारी लुबाडतोय; ‘प्रदूषण’ मंडळाचे नाव सांगून लाखोंचा गंडा, पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

Goa University: ‘पेपरलीक’चा तपासणी अहवाल माध्यमांकडे गेला कसा? ‘विद्यापीठ टिचर्स’ने उघडले तोंड; चौकशीची केली मागणी

Bhausaheb Bandodkar: ..भाऊसाहेबांना फक्त 10 वर्षेच मिळाली, पण त्यांनी गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली; पुण्यतिथी विशेष

SCROLL FOR NEXT