IDF fighter Jets Eliminated Ibrahim Biari, Commander of Hamas' Central Jabaliya Battalion. Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायली लष्कराचा धडका, हमासचा टॉप कमांडर ठार

Ibrahim Biari Gaza: इस्रायल-हमास यांच्यातील युद्धादरम्यान येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. पण इस्रायलने एरो एअर डिफेन्स सिस्टीम वापरून हे क्षेपणास्त्र नष्ट केले. इस्रायलने प्रथमच आपल्या एरो एअर डिफेन्स सिस्टमचा वापर केला आहे.

Ashutosh Masgaunde

Israel Defense Forces fighter jets eliminated Ibrahim Biari, Commander of Hamas' Central Jabaliya Battalion: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला 25 दिवस उलटले आहेत. या कालावधीत गाझामध्ये 8 हजारांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यात साडेतीन हजार मुले असल्याचा दावा केला जात आहे.

हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल गाझा पट्टीत हमासच्या विरोधात सातत्याने कारवाई करत आहे. यातच आता इस्रायली लष्कराने मंगळवारी हमासचा टॉप कमांडर आणि 50 दहशतवाद्यांना ठार केले.

इस्रायलच्या संरक्षण दलाने दावा केला आहे की, त्यांनी गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ल्यात हमासच्या सेंट्रल जबलिया बटालियनचा कमांडर इब्राहिम बियारी याला मारला आहे.

या हल्ल्यात इब्राहिम बियारी आणि इतर अनेक दहशतवादी मारले गेल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. लष्करी कारवाईदरम्यान, भूमिगत दहशतवादी बोगदे उद्ध्वस्त करण्यात आले, त्यामुळे जवळपासच्या अनेक इमारतीही कोसळल्या.

इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, बियारी हा त्या कमांडरपैकी एक होता ज्यांनी हमासच्या एलिट नुखबा सैन्याच्या सदस्यांना 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करण्याचा आदेश दिला होती.

2004 मध्ये अश्दोद बंदरावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाठवण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती, ज्यामध्ये 13 इस्रायली ठार झाले होते. जबलियामध्ये लष्कराने हवाई हल्ले केले असून, हमासच्या सैनिकांना ठार करून परिसराचा ताबा घेतला आहे.

"गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या सैनिकांविरुद्ध कारवाईचे निर्देश देणारी हमास कमांड आणि कंट्रोल रूम नष्ट करण्यात आली," असे इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.

इस्रायलने हमासच्या तळावर केलेल्या या हल्ल्यानंतर परिसरातील पायाभूत सुविधाही कोलमडल्या आहेत. रहिवाशांना पुन्हा हा परिसर रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इजिप्त रफाह क्रॉसिंग उघणार

दरम्यान, मंगळवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच इजिप्त सिनाई द्वीपकल्पातील जखमी पॅलेस्टिनींवर उपचार करण्यासाठी रफाह क्रॉसिंग उघडणार आहे.

"गाझा येथून आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांना कोणत्या रुग्णालयात पाठवले जाईल हे ठरवण्यासाठी क्रॉसिंगवर वैद्यकीय पथके उपस्थित राहतील," असे इजिप्तच्या एल अरिश शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले.

आता येमेनमधूनही इस्रायलवर हल्ले

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या तीन आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक देश हमासच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात उभारले आहेत.

अशा स्थितीत येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. पण इस्रायलने एरो एअर डिफेन्स सिस्टीम वापरून हे क्षेपणास्त्र नष्ट केले. इस्रायलने प्रथमच आपल्या एरो एअर डिफेन्स सिस्टमचा वापर केला आहे.

येमेनमधील इराण सरकारचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याचे बोलले जात आहे.

या क्षेपणास्त्राचे लक्ष्य दक्षिण इस्रायलचे इलात शहर होते. इस्रायली लष्कराने सांगितले की, क्षेपणास्त्रांशिवाय आमच्यावर ड्रोन हल्लेही करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT