Airstrike Dainik Gomantak
ग्लोबल

सीरियाच्या लताकिया बंदरावर इस्रायलची 'एअरस्ट्राइक', हवाई हल्ल्यात कंटेनरला आग

सीरियाच्या राज्य माध्यमांनी लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, क्षेपणास्त्रे बंदरावर (Latakia Port) पडली जिथे अनेक कंटेनर ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

इस्रायली (Israel) लढाऊ विमानांनी (Fighter Plane) मंगळवारी पहाटे सीरियाच्या (Syria) लताकियाच्या (Latakia) बंदरावर क्षेपणास्त्रे (Israel airstrike on Syria) डागली आहेत. सीरियन लष्कराने (Syria Military) यासंबंधीची माहिती दिली आहे. या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. सीरियाच्या राज्य माध्यमांनी लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, क्षेपणास्त्रे बंदरावर (Latakia Port) पडली जिथे अनेक कंटेनर ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक कंटेनरला आग लागली. या प्रकरणी अधिकाऱ्याने मात्र अधिक माहिती दिलेली नाही. लताकिया हे आयातीसाठी अत्यंत महत्त्वाचे बंदर आहे. तसेच हे एक असे बंदर आहे, जिथे जीवनावश्यक वस्तू युद्धग्रस्त देशात पोहोचविल्या जातात. सीरियाच्या सरकारी टीव्हीने वृत्त दिले की, बंदरावर पाच स्फोट ऐकू आले. कंटेनर ठेवलेल्या भागात मोठ्या प्रमाणात आग लागली, त्यानंतर अग्निशमन दलाला त्या दिशेने पाठवण्यात आले. याबाबत इस्रायलच्या लष्कराकडून (Israeli military) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इस्रायलने सीरियन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांवर शेकडो वेळा हवाई हल्ले केले आहेत. परंतु त्यांनी यासंबंधी क्वचितच मान्य केले आहेत.

इस्रायलने इराण समर्थित मिलिशयांना लक्ष्य केले

यापूर्वी इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात (Israel Airstrike) सीरियाची राजधानी दमास्कसच्या (Damascus) मुख्य विमानतळालाही लक्ष्य करण्यात आले आहे. तथापि, इस्रायलने कबूल केले आहे की, आमचे लक्ष्य नेहमीच इराण (Iran) समर्थित मिलिशिया होते. यामध्ये लेबनॉनच्या (Lebanon) हिजबुल्लाह गटाचा समावेश आहे, ज्याने सीरियामध्ये आपले सैनिक तैनात केले आहेत. दशकभराच्या गृहयुद्धात सीरियाचे अध्यक्ष बशर असद (Bashar Assad) यांच्या सैन्याच्या वतीने हिजबुल्ला लढत आहे.

ऑक्टोबरमध्ये दमास्कस विमानतळावर क्षेपणास्त्रे डागली

इस्रायलचे म्हणणे आहे की, इराणचे उत्तर सीमेवरील अस्तित्व लाल रेषेसारखे आहे. याचा हवाला देऊन इस्रायलने सीरियातील शस्त्रास्त्रांच्या तळांना लक्ष्य केले. याआधी इस्रायलने ऑक्टोबरमध्ये सीरियामध्ये हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात दोन परदेशी सैनिक ठार झाले, तर सहा सीरियन सैनिक जखमी झाले. दमास्कस विमानतळाबाहेर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायलने रात्री 9 वाजता हा हल्ला केला. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ड्रोन डेपोला लक्ष्य करण्यात आले. त्याचवेळी इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्याने हल्ल्याची कबुली दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT