Terrorist  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: खलिस्तानी दहशतवाद्यांना ISI पुरवतेय शस्त्रे, भारतात घातपात घडवून आणण्यासाठी...!

ISI Planning To Attack In India: भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय काळ्या बाजारातून शस्त्रे विकत घेत आहे.

दैनिक गोमन्तक

ISI Planning To Attack In India: भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय काळ्या बाजारातून शस्त्रे विकत घेत आहे. विशेष म्हणजे, ही शस्त्रे पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठवत आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील काळ्या बाजारातून ही शस्त्रे खरेदी केली जात आहेत.

यासोबतच, खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने पंजाबमध्ये ही शस्त्रे पाठवली जात आहेत. डीजीपी-आयजीपी परिषदेत पाकिस्तानच्या या कारस्थानांवर चर्चा झाली आहे.

तसेच, खलिस्तानी दहशतवादी (Terrorist) वाधवा सिंग बब्बर, हरविंदर सिंग रिंडा, रणजित सिंग नीता आणि लखबीर सिंग रोडे हे पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत. आयएसआय भारतात दहशतवादी कारस्थानासाठी त्यांचा वापर करत आहे. पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी खलिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील सीमेवर असलेल्या काळ्या बाजारातून शस्त्रे पुरवली जात आहेत, आणि ही शस्त्रे ड्रोनच्या मदतीने भारतात पाठवली जात आहेत.

पाकिस्तानी सीमेवर अमेरिकन शस्त्रे विकली जात आहेत

अफगाणिस्तानातील (Afghanistan) अमेरिकन सैनिकांची अनेक शस्त्रे पाकिस्तानच्या काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने भारतात ड्रग्जचा पुरवठाही केला जात आहे. तसेच अमेरिका, कॅनडा, ब्रिटन यांसारख्या देशांमध्ये खलिस्तानवाद्यांच्या मदतीने भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT