Terrorist
Terrorist Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: आयएसआयचा पर्दाफाश, काश्मीर-पंजाबमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट...!

Manish Jadhav

Pakistan News: जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया तीव्र करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI (ISI) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) यांनी मिळून भारताविरुद्ध मोठा कट रचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब आणि जम्मूला लागून असलेल्या भारतीय सीमेमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट रचण्यात आला आहे. जैशच्या दहशतवाद्यांना आयएसआयकडून बोगद्याद्वारे भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

गुप्तचर अहवालानुसार, जम्मू आणि पंजाबमधील गुरुदासपूरला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवरुन जैशच्या दहशतवाद्यांना प्रवेश देण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

भारतीय गुप्तचर संस्थांनी जैशच्या दहशतवाद्यांचे संदेश डीकोड केले, ज्यात त्यांना पंजाब आणि जम्मूला लागून असलेल्या सीमापार भागात बोगदे खोदण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, गेल्या वर्षी मे महिन्यातही सीमा सुरक्षा दलाला (BSF) जम्मूच्या सांबामध्ये अशाच एका बोगद्याची माहिती मिळाली होती, ज्याद्वारे जैशचे दहशतवादी घुसखोरी करणार होते.

सुरक्षा दलांनी बोगद्यातून घुसखोरी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला होता.

दुसरीकडे, एका केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये बोगद्यातून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याच्या कटाची माहिती सातत्याने मिळत आहे. आता सीमेपलीकडून जम्मू तसेच पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांसाठी दहशतवादी गटांना सूचना दिल्या जात आहेत.

त्याचबरोबर, पंजाब (Punjab) आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट अंमलात आणण्यासाठी सीमेपलीकडून ड्रोनद्वारे ड्रोन आणि शस्त्रास्त्रे भारतीय सीमेपर्यंत पोहोचवण्याचेही सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, भारताविरुद्धच्या ड्रोन ऑपरेशनला गती देण्यासाठी आयएसआयने जैश-ए-मोहम्मदच्या मदतीने लाहोरमध्ये ड्रोन स्टोरेज गोदाम उभारले आहे, ज्यामध्ये चीनमधून मोठ्या प्रमाणात ड्रोन आयात करुन ठेवण्यात आले आहेत.

अहवालानुसार, ड्रोन स्टोरेज सेंटरची कमान जैशकडे सोपवण्यात आली आहे. जैशचे दहशतवादी हे ड्रोन लाहोर ते सियालकोटला लागून असलेल्या पंजाब सीमेवर घेऊन जातात.

जैशच्या दहशतवाद्यांनी जम्मूला लागून असलेल्या पाकिस्तानातील सियालकोट आणि पंजाबमधील डेरा बाबा नानकला लागून असलेल्या नारोवालमध्ये ड्रोन भारतीय सीमेत घुसण्यासाठी लॉन्चिंग सेंटर बनवले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, आयएसआय (ISI) पंजाबमधील डेरा बाबा नानक आणि गुरुदासपूरमध्ये ड्रोनद्वारे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्याचा कट रचत आहे. सीमेपलीकडून शत्रूचा कोणताही कट हाणून पाडण्यासाठी बीएसएफ आणि लष्कर सीमेवर पूर्णपणे सतर्क आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT