Sudan Political Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Sudan Crisis: लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्समध्ये सत्ता संघर्ष, 30 ठार, 400 जण जखमी; भारतीयांसाठी...

Sudan Political Crisis: एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाजवळ गेल्या अनेक तासांपासून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

Manish Jadhav

Sudan Power Struggle Between Army Paramilitaries: सुदानची राजधानी खार्टूममध्ये रॅपिड सपोर्ट फोर्स आणि देशाच्या लष्करामध्ये अनेक दिवसांच्या तणावानंतर परिस्थिती अनियंत्रित झाली आहे.

देशभरात सातत्याने गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाजवळ गेल्या अनेक तासांपासून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.

सुदानीज डॉक्टर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 183 लोक जखमी झाले आहेत.

गृहयुद्धासारखी परिस्थिती असताना सत्तापालट होण्याची शक्यता आहे.

सुदानमध्ये सत्तापालट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत.

मृतांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खार्टूमसह, ओमदुरमन, न्याला, एल ओबेद आणि एल फाशर या शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. ही शहरे राजधानी खार्टूमच्या पश्चिमेस आहेत.

त्याचवेळी, आरएसएफने दावा केला आहे की, त्यांनी राष्ट्रपती भवनासह राजधानी खार्तूनमधील अनेक भाग ताब्यात घेतले आहेत, तर सुदानी सैन्य हा दावा फेटाळत आहे. खरे तर, लष्करी नेता अब्देल फताह अल बुरहान आणि त्यांचा नंबर दोन मोहम्मद हमदान डागलो यांच्यात सत्तासंघर्ष आहे.

लष्कराने एका छावणीवर हल्ला केला होता

लष्कराचे म्हणणे आहे की, चकमक सुरु आहे, आरएसएफचे सैनिक लष्करी मुख्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे देशाच्या रक्षणासाठी लष्कर (Army) आपले कर्तव्य बजावत आहे.

त्याचवेळी, निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) च्या निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, खार्तूम विमानतळावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांनी राजधानी खार्तूममधील राष्ट्रपती राजवाड्याचा ताबा घेतला आहे.

निमलष्करी दल आणि लष्कर यांच्यात संघर्ष का?

सुदानमध्ये लष्कराने सत्तापालट केला होता, तेव्हापासून ते सार्वभौम परिषदेच्या माध्यमातून देश चालवत आहे. तर आरएसएफची कमान कौन्सिलचे उपाध्यक्ष जनरल मोहम्मद हमदान डागलो यांच्याकडे आहे.

लष्कराचे नेतृत्व जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांच्याकडे आहे, जे सार्वभौम परिषदेचे प्रमुख आहेत. लष्कर आणि आरएसएफमधील शत्रुत्व हे सत्तेतून पदच्युत करण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्या राजवटीच्या काळातील आहे.

भारतीयांसाठी अॅडवायझरी

भारतीय परराष्ट्र मंत्रालय सुदानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी भारतीय दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सर्व भारतीयांना अलर्ट - सुदानमधील गोळीबार आणि संघर्ष पाहता, तुम्हाला खबरदारी घेण्याचा, घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेर पडणे थांबवा. घाबरु नका आणि अधिक माहितीची प्रतीक्षा करा.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT