Sudan: दारफुरमध्ये जातीय हिंसाचार, 100 जणांचा मृत्यू; 20 हून अधिक गावात भीषण आग

सुदानच्या युद्धग्रस्त दारफुर प्रांतात गेल्या आठवड्यात वांशिक संघर्षात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Sudan
SudanDainik Gomantak
Published on
Updated on

सुदानच्या युद्धग्रस्त दारफुर प्रांतात गेल्या आठवड्यात वांशिक संघर्षात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजन्सी आणि समुदायाच्या नेत्याने सोमवारी ही माहिती दिली.

दरम्यान, UNHCR चे समन्वयक टोबी हार्वर्ड यांनी सांगितले की, पश्चिम दारफुर प्रांतातील कुलबास शहरात जमिनीच्या वादावरुन अरब आणि आफ्रिकन जमातींमध्ये संघर्ष झाला. यानंतर, स्थानिक मिलिशियाने परिसरातील अनेक गावांवर हल्ले केले आणि हजारो लोकांना पळून जावे लागले.

Sudan
Sudan Crisis: अब्दुल्ला हमडोक पुन्हा एकदा येणार सत्तेवर, लष्कराशी झाली सहमती

तसेच, अबकर अल-तोम यांनी सांगितले की, मिलिशयांनी 20 हून अधिक गावे जाळल्यानंतर 62 मृतदेह सापडले. त्यांनी पुढे सांगितले की, अनेकांचा ठावठिकाणा अद्याप कळलेला नाही. ही चकमक दारफुरमधील वांशिक हिंसाचाराची ताजी घटना आहे. एप्रिलच्या सुरुवातीला, सुदानच्या (Sudan) पश्चिम दारफुर प्रदेशात आदिवासी (Tribal) अरब आणि गैर-अरब यांच्यात शनिवार व रविवारच्या संघर्षात मृतांची संख्या 200 ओलांडली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

क्रेनिक शहरात 103 जण जखमी

पश्चिम दारफुरचे प्रांतीय गव्हर्नर खामिस अब्दल्ला अबकर यांनी सांगितले की, क्रेनिक शहरात झालेल्या संघर्षात 103 लोक जखमी झाले आहेत. अलिकडच्या वर्षांतील सर्वात प्राणघातक चकमकींपैकी एक म्हणजे जेनेनापासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या क्रेनिकच्या बाहेर दोन मेंढपाळांच्या हत्येमुळे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com