Tanks
Tanks Dainik Gomantak
ग्लोबल

India नाटो संघटनेचा भाग होणार? अमेरिकन अधिकाऱ्याने दिले 'हे' मोठे वक्तव्य

Manish Jadhav

North Atlantic Treaty Organization: जगातील 40 देशांची लष्करी संघटना नाटोची ताकद सर्वांनाच ठाऊक आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोचा सदस्य होण्याबाबत अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठे विधान केले आहे.

या अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला नाटोचे खुले आमंत्रण आहे. अमेरिकेचे स्थायी प्रतिनिधी ज्युलियन स्मिथ यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन अर्थात 'नाटो'मध्ये भारत सामील होण्याबाबत पहिली सार्वजनिक टिप्पणी केली आहे.

भारतासोबत अधिक चर्चेसाठी युती तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मिथ यांनी पुष्टी केली की, दिल्लीतील वार्षिक रायसीना डॉयलॉगच्या वेळी नाटो आणि काही भारतीय अधिकाऱ्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली.

दरम्यान, सध्या नाटोमध्ये 40 देश आहेत. 4 आणि 5 एप्रिल रोजी ब्रुसेल्समध्ये नाटो देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि जपानलाही या बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय पॅसिफिक प्रदेशातील हे चार देश या महाआघाडीचे औपचारिक भागीदार आहेत.

भारताला बैठकीचे निमंत्रण का मिळाले नाही, याचे कारण अधिकाऱ्याने सांगितले

स्मिथ यांना विचारण्यात आले की, भारतालाही (India) या बैठकींमध्ये सहभागी होण्यासाठी आणि संघटनेचा सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे का?

यावर ते म्हणाले की, 'भविष्यात नाटोमध्ये सामील होण्यासाठी भारतासाठी दरवाजे खुले आहेत. पण भारतालाही त्यात रस असायला हवा. जोपर्यंत भारताचे हित निश्चित होत नाही, तोपर्यंत भारताला मंत्रिस्तरीय बैठकीचे निमंत्रण मिळणार नाही.''

स्मिथ यांनी हे देखील मान्य केले की, भारत-पॅसिफिक क्षेत्र मुक्त आणि खुले होण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची आहे.

दुसरीकडे, ज्युलियन स्मिथ यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे आणि आसियानपासून भारतापर्यंत चीनच्या आक्रमकतेची चर्चा सुरु आहे.

तज्ज्ञांच्या मते, चीनच्या आक्रमकतेचा परिणाम म्हणजे युरोपपासून भारतीय पॅसिफिक प्रदेशापर्यंत मोठे भू-राजकीय बदल होताना दिसत आहेत.

नाटोमध्ये सामील होण्यासाठी भारताला अनेकवेळा विचारणा केली जात आहे, परंतु आजपर्यंत भारत सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT