Indus Water Treaty: भारत रोखणार पाकिस्तानचे पाणी! मोदी सरकारने जारी केली नोटीस

Indus Water Treaty: 1960 मध्ये झालेला सिंधू नदीचा करार आहे. सिंधू नदी करारात दुरुस्ती करण्यासाठी भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवली आहे.
Indus Water Treaty
Indus Water TreatyDainik Gomantak

Indus Water Treaty: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले वाद संपूर्ण जगाला परिचित आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादाला असलेला पाठिंब्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने आरोप- प्रत्यारोप होत असतात.

आता पुन्हा भारत-पाकिस्तानमध्ये वादाला सुरु झाले आहेत. याचे कारण म्हणजे, 1960 मध्ये झालेला सिंधू नदीचा करार आहे. सिंधू नदी करारात दुरुस्ती करण्यासाठी भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवली आहे.

पाकिस्तान या करारातील नियमांचे पालन करण्यात करत नसल्याने सिंधू नदीच्या पाण्याच्या वितरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिणामांचा विचार करुन पाकिस्तानला नोटीस पाठवणे भाग पडले आहे, असे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानला ही नोटीस सिंधू नदी करार 1960 च्या XII(2) नुसार पाठवण्यात आली आहे.

भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करार (IWT) मध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. भारत सरकारने म्हटले आहे की, 'पाकिस्तानच्या सर्व चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे भारताला IWT च्या सुधारणेसाठी नोटीस जारी करण्यास भाग पाडले आहे.'

भारताने जबाबदारी पार पाडली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या कृत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना, भारत सरकारने असेही म्हटले आहे की, 'पाकिस्तानसोबत सिंधू जल कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारत भागीदार आहे, परंतु पाकिस्तानकडून जबाबदारी पार पाडण्यात हालगर्जीपणा झाला.'

Indus Water Treaty
PM Narendra Modi: खरंच, पंतप्रधान मोदी तामिळनाडुतून निवडणूक लढवणार?

इंडस( Indus ) कमिशनला नोटीस

भारत सरकारने सांगितले की, 'भारताने परस्पर मध्यस्थीचा मार्ग शोधण्याचा वारंवार प्रयत्न करुनही, 2017 ते 2022 या कालावधीत सिंधू आयोगाच्या 5 बैठकांमध्ये पाकिस्तानने या मुद्द्यावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. अशा कारणांमुळे आता पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आली आहे.'

वास्तविक, सिंधू जल कराराच्या तरतुदीनुसार सतलज, बियास आणि रावीचे पाणी भारताला आणि सिंधू, झेलम आणि चिनाबचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले आहे. भारत( India ) आणि पाकिस्तान( Pakistan )ने 9 वर्षांच्या वाटाघाटीनंतर 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये जागतिक बँकेनेदेखील मध्यस्ती केली होती.

तसेच, दोन्ही देशांचे जल आयुक्त वर्षातून दोनदा भेटतात. यामध्ये ते प्रकल्पाच्या ठिकाणांना आणि नदीच्या मुख्य कामांना भेटी देतात. मात्र पाकिस्तानकडून या कराराच्या नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com