VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

pakistan ex senator: दरम्यान, पाकिस्तानातून एक व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
pakistan ex senator
pakistan ex senatorDainik Gomantak

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसप्रणित इंडिया अलायन्सने भाजपचा (BJP) हा विजयीरथ रोखण्यासाठी जोर लावला आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानचे माजी सिनेटर फैसल अबिदी यांनी भारताच्या अंतर्गत घडामोडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत आपल्या प्रक्षोभक वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. 'अखंड भारत' संदर्भात अबिदी यांनी केलेल्या वक्तव्याने भारताच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि पाकिस्तान भारताच्या प्रतिकात्मक संकेतामुळे "नाराज" असल्याचा दावा त्यांनी केला. अबिदी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. 2026 पर्यंत भारताची शकलं पडतील, असे ते म्हणाले. झी टीव्ही न्यूजवर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, अबिदी यांना पंतप्रधान मोदींच्या कथित 'हिंदुत्व' अजेंडाबद्दल आणि त्यांना भारतीयांकडून मिळत असलेल्या मोठ्या समर्थनाबद्दल विचारण्यात आले होते.

या प्रश्नाला उत्तर देताना अबिदी म्हणाले की, "जेव्हा मोदी सरकारने आपल्या संसदेत 'अखंड भारताचे’ भित्तिचित्र लावले, तेव्हा नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती. खासकरुन, पाकिस्तानने भारताच्या या कृतीबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती, मात्र तेव्हा लोकांनी आमची खिल्ली उडवली. मी तुम्हाला वचन देतो की, 26 नोव्हेंबर 2026 पर्यंत भारताचे इतके तुकडे होतील की तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. मोदींच्या सत्ताकाळातच भारत नष्ट होईल.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com