Iranian scientist and a senior military officer found death Dainik Gomantak
ग्लोबल

इराणमध्ये मोसादकडून घातपात ? एक शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

इस्रायलचा आपल्या नागरिकांना तुर्कीला न जाण्याचा इशारा

दैनिक गोमन्तक

तेहरानमध्ये एका लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञाचा गूढस्थितीत मृत्यू झाला आहे. यामूळे इराण आणि इस्रायलमधील नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. लष्करी अधिकारी कर्नल अली इस्माइलजादेह यांचा शुक्रवारी गूढरित्या मृत्यू झाला आहे. इराणमधील या ताज्या मृत्यूंकडे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादकडे ही संशयाने पाहिले जात आहे. (Iranian scientist and a senior military officer dead)

मिळालेल्या माहितीनुसार अली इस्माइलजादेह इराणी शास्त्रज्ञ शस्त्रास्त्रांमध्ये तज्ज्ञ होते. आणि ते तेहरानमध्ये मृतावस्थेत सापडले होते. कर्नल अली इस्माइलजादेह असे या इराणी लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. एका इंग्रजीवृत्तपत्राने याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्या वृत्तात म्हटले आहे की, कर्नल सय्यद खोदाई यांची तेहरानमधील त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. याला काही दिवस होतात न होतात तोच कर्नल अली यांची हत्या करण्यात आली आहे. कर्नल अली आणि कर्नल सय्यद हे दोघेही इराणी लष्कराच्या उच्च प्रशिक्षित कुड्स फोर्सचे सदस्य होते.

इस्रायलने युनिट 840 वर केला आरोप

कर्नल सय्यद आणि कर्नल अली दोघेही इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड फोर्सच्या युनिट 840 चे सदस्य होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युनिटचे वर्णन दहशतवादी संघटना म्हणून केले आहे. इस्रायलचा आरोप आहे की युनिट 840 चे सदस्य परदेशात लोकांना मारण्यासाठी मिशन करतात.

इस्रायली अधिकार्‍यांनी असेही सांगितले की, कर्नल सय्यदची हत्या युनिट 840 च्या ऑपरेशनला चेतावणी देण्यासाठी होती. कर्नल सय्यद हे युनिटचे डेप्युटी कमांडर असल्याचे सांगण्यात आले. या हत्याकांडानंतर शत्रूच्या कोणत्याही दुष्ट कृतीला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणच्या लष्कराच्या कमांडरने दिला. तो म्हणाला की ज्यू धर्माला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा दिली जाईल. दरम्यान, तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या नागरिकांना तुर्कीला न जाण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT