Mojtaba Khamenei Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

Iran Supreme Leader Warns Gulf Nations: इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी एक अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक विधान केले.

Manish Jadhav

Mojtaba Khamenei Telegram Statement: मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविराम घडवून आणण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु असतानाच, इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांनी एक अत्यंत आक्रमक आणि खळबळजनक विधान केले. खाडी देश आता अमेरिकन लष्करी तळांसाठी 'ढाल' म्हणून काम करणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर ही घडामोड समोर आली.

विशेष म्हणजे, 58 वर्षीय सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई हे युद्ध सुरु झाल्यापासून कधीही जाहीरपणे लोकांसमोर आलेले नाहीत, मात्र टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून त्यांचे लिखित संदेश सातत्याने प्रसिद्ध होत असतात. यावेळीही त्यांनी ईद अल-अधाच्या निमित्ताने एक सविस्तर लिखित संदेश जारी केला.

या संदेशात खामेनेई यांनी अमेरिकेचा (America) उल्लेख 'महान सैतान' आणि इस्रायलचा उल्लेख 'त्याचा पाळीव हिंस्र प्राणी' असा केला असून इराणच्या सशस्त्र दलांच्या कामगिरीचे तोंडभरुन कौतुक केले. आगामी 25 वर्षांत इस्रायलचे अस्तित्व जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकू, असा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार या आपल्या शेजारील देशांना थेट शब्दांत सुनावले. जर या देशांनी त्यांच्या भूमीवरील अमेरिकन लष्करी तळांचा वापर इराणविरुद्धच्या कारवाईसाठी करु दिला, तर इराण त्यांनाही सोडणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला.

इराणी सरकारी दूरदर्शन आणि 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खामेनेई यांनी म्हटले की, काळाचे चक्र आता मागे फिरणार नाही. या संपूर्ण क्षेत्रातील राष्ट्रे आणि त्यांची भूमी आता अमेरिकेच्या संरक्षणासाठी स्वतःचा बळी देणार नाही. मध्य पूर्व आशियातील अमेरिकेचा जुना दबदबा आता कायमचा संपला असून, अमेरिका कितीही प्रयत्न केले तरी तो सुवर्णकाळ परत आणू शकत नाही. अमेरिकेचा प्रभाव दिवसेंदिवस वेगाने कमी चालला आहे.

दुसरीकडे, या तणावाच्या वातावरणातच दोन्ही बाजूंनी एका महत्त्वपूर्ण कराराच्या दिशेने सकारात्मक पावले टाकल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य करारामुळे युद्धाला पूर्णविराम मिळू शकतो आणि अंतिम तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या मध्यस्थांना 60 दिवसांचा अवधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शांततेच्या या चर्चा सुरु असतानाच खामेनेई यांच्या या कडक भूमिकेमुळे खाडी देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT