Mojtaba Khamenei Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: इराणचा कणा मोडला, हुंकार क्षीण झाला! मोजताबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबतच्या मेमोनं उडवली खळबळ; ट्रम्प यांचा अल्टिमेट

Iran Supreme Leader Incapacitated Qom Treatment: इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या 'बेशुद्ध' असल्याचे खळबळजनक वृत्त 'द टाइम्स'ने एका गुप्तचर अहवालाच्या हवाल्याने दिले.

Manish Jadhav

Mojtaba Khamenei Unconscious: मध्यपूर्वेतील युद्ध एका निर्णायक आणि अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या 'बेशुद्ध' असल्याचे खळबळजनक वृत्त 'द टाइम्स'ने एका गुप्तचर अहवालाच्या हवाल्याने दिले. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंतचा अंतिम इशारा दिला असून त्यानंतर इराणला भयानक परिणाम भोगण्याची धमकी दिली.

मोजताबा खामेनेई यांची प्रकृती चिंताजनक

गुप्तचर अहवालानुसार, मोजताबा खामेनेई यांच्यावर इराणमधील 'कोम' शहरात उपचार सुरु आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्थांनी आखाती मित्रराष्ट्रांसोबत शेअर केलेल्या एका राजनैतिक मेमोमध्ये म्हटले की, खामेनेई सध्या निर्णय घेण्याच्या किंवा सरकार चालवण्याच्या स्थितीत नाहीत. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरु झाल्यापासून ते सार्वजनिकरीत्या दिसलेले नाहीत. असे मानले जाते की, युद्धाच्या सुरुवातीच्या हवाई हल्ल्यांमध्ये ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कोममध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या दफनविधीची तयारीही सुरु असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे इराणच्या सत्तावर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची चिन्हे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

दुसरीकडे, इराणमधील (Iran) अस्थिरतेचा फायदा घेत ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी आज रात्री 8 वाजेपर्यंतची मुदत दिली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "त्यांनी 7 दिवसांची मुदतवाढ मागितली होती, मी त्यांना 10 दिवस दिले. आता त्यांच्याकडे उद्यापर्यंतचीच (आज रात्रीची) वेळ आहे. त्यानंतर इराणमध्ये एकही पूल उरणार नाही, एकही पॉवर प्लांट शिल्लक राहणार नाही. आम्ही इराणला थेट पाषाण युगात नेऊन सोडू."

इराणची शक्ती क्षीण

ट्रम्प यांनी असा दावा केला की, 28 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या कारवाईत अमेरिकेने इराणची शक्ती पूर्णपणे क्षीण केली. "एका महिन्यापूर्वीचा इराण शक्तिशाली होता, पण आता नाही. सध्या त्यांचे नेतृत्व 'शिरच्छेद' (Decapitated) झाल्यासारखे आहे," असेही ट्रम्प यांनी नमूद केले. अमेरिकेने आतापर्यंत इराणमधील 11,000 हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केल्याचे सांगत, ही कारवाई अनेक दशकांपूर्वीच व्हायला हवी होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या इराणचे वॉशिंग्टनमधील प्रतिनिधित्व पाकिस्तानी दूतावासाद्वारे चालवले जात असून अमेरिकेने या मेमोबाबत इराणच्या राजनैतिक प्रतिनिधींशी संपर्क साधला. आज रात्रीची मुदत संपल्यानंतर अमेरिका (America) कोणती मोठी लष्करी कारवाई करणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT