Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायलवरील हल्ल्यात इराणाचा हात? हमासला तेहरानकडून शस्त्रे मिळाल्याचा खळबळजनक दावा

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, या युद्धाबाबत अनेक देशांच्या भूमिका स्पष्ट होत आहेत.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, या युद्धाबाबत अनेक देशांच्या भूमिका स्पष्ट होत आहेत. इस्रायलवरील हल्ल्यामागे इराण आहे का? हमासच्या सैनिकांनी इस्त्रायलींवर हल्ला केलेली शस्त्रे तेहरानने पाठवली होती का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

वास्तविक, द सनने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत मोठा दावा केला आहे. त्यानुसार इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमासने इराणच्या विनाशकारी शस्त्रास्त्रांचा वापर केल्याचे पुरावे आहेत.

वृत्तानुसार, द सनच्या पत्रकारांना दक्षिण इस्रायलमधील गुप्त लष्करी तळावर बोलावण्यात आले. इथे त्यांना 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात वापरण्यात आलेली शस्त्रे आणि दारुगोळा दाखवण्यात आला. हमासने केलेल्या या अचानक हल्ल्यांमध्ये 1,400 ज्यू मारले गेले.

दरम्यान, लष्करी तळाच्या या शस्त्रागारात एके-47, ग्रेनेड, माइन्स, आयईडी, टायमर आणि आत्मघाती ड्रोन दिसले. अयातुल्ला अली खेमेनी यांच्या नेतृत्वाखालील कट्टरवादी इस्लामिक स्टेटने थर्मोबॅरिक ग्रेनेड देखील पुरवले होते. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी ते इस्रायली घरांवर फेकले आणि काही सेकंदात सर्व काही जळून राख झाले.

इस्त्रायली सैनिकांनी युद्धभूमीवरुन इराणमध्ये बनवलेले मोर्टार रॉकेट आणि माइन्सही जप्त केले आहे. ही सर्व शस्त्रे लष्करी तळाच्या आत ठेवण्यात आली होती. या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा हा एक छोटासा भाग असल्याचे इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.

इस्रायलच्या गावातून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत

इस्रायलच्या क्रॅक बॉम्ब डिस्पोजल युनिटमधील एका मेजर रँक अधिकाऱ्याने द सनच्या पत्रकाराला ही शस्त्रे दाखवली. यावेळी अधिकाऱ्याने आपला चेहरा झाकून ठेवला होता आणि काही अटींमुळे त्याने आपले नावही उघड केले नाही. मात्र, लष्करी तळावरुन वार्तांकन करताना पत्रकाराने त्यांना मेजरजी म्हटले.

इस्रायलवरील हल्ल्यात तेहरानचा हात असल्याची त्याची पूर्ण खात्री आहे. त्याने हातात अनेक थर्मोबॅरिक ग्रेनेड्सपैकी एक ग्रेनेड दाखवत तो म्हणाला की, 'तुम्ही इथे जे काही बघता ते आम्ही आमच्या देशातून आणले आहे. हे गाझामधून नाही आणले. हमासच्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये ही शस्त्रे इस्रायलमध्ये आणली होती.

शस्त्रे बोगद्यांमध्ये साठवून ठेवली जात होती

मेजर म्हणाले की, 'आम्हाला युद्धभूमीत जे काही सापडले त्याचा हा एक छोटासा भाग आहे. यापैकी सुमारे 15 टक्के मेड-इन-इराण आहेत. हे मोर्टार, फ्यूज आणि स्फोटके ही त्यांची आहेत. हे इराणमध्ये (Iran) बनवले गेले होते आणि हमासने वापरण्यापूर्वी ते गाझा पट्टीत आणण्यात आले होते.

हत्याकांडाच्या ठिकाणांवरुन जप्त करण्यात आलेले रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि इतर क्षेपणास्त्रे उत्तर कोरियामध्ये तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मेजर यांचा असा विश्वास आहे की, हमासचे दहशतवादी 500 रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्स, सुमारे 200 आयईडी आणि 1,000 पेक्षा जास्त एके-47 ने सज्ज होते. हा हल्ला दोन वर्षांपासून नियोजित असल्याचे मानले जात आहे. यावेळी गाझाच्या भूमिगत बोगद्यांमध्ये ही शस्त्रे ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..काँग्रेसमध्ये भाजपला मदत करणारा ‘रोग’! एल्‍विस गोम्‍स यांचे टीकास्त्र; नेत्‍यांना ‘डिटॉक्‍स’ करण्‍याची गरज असल्याचा दावा

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंच्या अडचणीत वाढ! जामिनास पीडित कुटुंबांचा विरोध, हस्तक्षेप याचिका दाखल; 7 जानेवारीच्‍या सुनावणीकडे लक्ष

‘जिंदा काट दूंगा’, चाकू काढून दिली धमकी! भररस्‍त्‍यावर गुंडांकडून विनयभंग, मारहाण; महिलेसह कुटुंबावर हल्ला; चौघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

Goa Nightclub Fire: बर्च अग्नितांडव प्रकरणी 15 अधिकाऱ्यांवर ‘बडगा’! सरपंच, पंचायत सचिवांवरही टांगती तलवार

Horoscope: वर्षाचा शेवट सुखाचा आणि नवा संकल्प! 'या' राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे भविष्य

SCROLL FOR NEXT