Iran Sepehran Airlines Boeing 737 Accident Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Iran Sepehran Airlines Boeing 737 Accident: इराणच्या मशहद विमानतळावरुन उड्डाण करताच सेपेहरान एअरलाइन्सच्या बोइंग 737 विमानाचा हवेतच भीषण स्फोटासह टायर फुटल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली.

Manish Jadhav

Iran Sepehran Airlines Boeing 737 Accident: इराणच्या मशहद विमानतळावरुन उड्डाण करताच सेपेहरान एअरलाइन्सच्या बोइंग 737 विमानाचा हवेतच भीषण स्फोटासह टायर फुटल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. हा झटका इतका तीव्र होता की, संपूर्ण विमानाचे केबिन हादरले आणि फुटलेल्या टायरच्या रबराचे तुकडे थेट विमानाच्या धगधगत्या इंजिनमध्ये जाऊन घुसले. या अपघाताचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला, ज्यामध्ये विमानाच्या केबिनचा एक भाग तुटताना दिसत असून आतील भाग प्रवाशांवर कोसळला. मृत्युच्या दारात उभे असलेले प्रवासी जिवाच्या आकांताने किंचाळत एकमेकांवर पडत होते आणि देवाचा धावा करत होते.

इराणच्या (Iran) मशहद शहरातील शहीद हाशमीनेजाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन करमानशाह शहराकडे जाण्यासाठी या विमानाने टेकऑफ केले होते. रनवेवरुन उड्डाण करेपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते; मात्र, जशी विमानाने हवेत गती पकडली, तसा विमानात अचानक बॉम्बस्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. क्षणात विमानाचे संतुलन बिघडले, केबिनमधील लाईट्स मंद झाल्या आणि विमानाचे दोन तुकडे होऊन ते कोणत्याही क्षणी खाली कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. विमानातील सर्व प्रवाशांना आज आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस असल्याचे वाटू लागले होते.

मात्र, अशा अत्यंत गंभीर आणि भयानक परिस्थितीत विमानाच्या वैमानिकांनी अभूतपूर्व प्रसंगावधान आणि कौशल्याचे दर्शन घडवले. एका बाजूचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले असताना आणि टायर फुटलेले असतानाही, वैमानिकाने तात्काळ मशहद विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून इमर्जन्सी घोषित केली. विमानतळ प्रशासनाने लगेचच रेड अलर्ट जारी केला. वैमानिकाने अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने डॅमेज झालेल्या विमानाची पुन्हा मशहद विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग घडवून आणली. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले असून मोठ्या विमानाचा भीषण अपघात टळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT