Iran-Israel Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindhu: 1000 भारतीयांना घेऊन इराणहून दिल्लीला येणार विमान! इस्त्रायलविरुद्धच्या युद्धादरम्यान इराणकडून एअरस्पेस पुन्हा ओपन

Indian evacuation Iran:इस्रायलसोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे इराणने आपला एअरस्पेस बंद केला होता. मात्र आता इराणने भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी आपला एअरस्पेस ओपन केला आहे.

Manish Jadhav

Israel Iran Conflict: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष धोकादायक वळणावर पोहोचला आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. मात्र या संघर्षात दोन्ही देशांचे सामान्य नागरिक आपला जीव गमावत आहेत. इस्रायलसोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे इराणने आपला एअरस्पेस बंद केला होता. मात्र आता इराणने भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी आपला एअरस्पेस ओपन केला आहे. आज रात्री (शुक्रवार, 20 जून ) 1,000 भारतीय नागरिक इराणहून नवी दिल्लीत पोहोचतील. इराणहून दिल्लीला भारतीय नागरिकांना आणण्यासाठी मशहादहून हवाई चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ भारतीय नागरिक इराणी विमानाने मायदेशी परततील.

चार्टर्ड विमानांची व्यवस्था

इराणमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, इराण सोडू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करु इच्छित आहे यावर अधिकाऱ्यांनी भर दिला.

'ऑपरेशन सिंधू'

भारत सरकारने दोन दिवसांपूर्वी 'ऑपरेशन सिंधू' सुरु केले तेव्हा इराणने ही व्यवस्था केली. या ऑपरेशन अंतर्गत भारत सरकार इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यास मदत करत आहे. इस्रायलकडून वाढत्या लष्करी हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

भारतातील इराणी मिशनचे उपप्रमुख जावेद हुसैनी काय म्हणाले?

भारतातील इराणी मिशनचे उपप्रमुख मोहम्मद जावेद हुसैनी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, 'इराणने इस्त्रायली हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही या हल्ल्यांच्या माध्यमातून लष्करी क्षमता दाखवली. जर शांतता हवी असेल तर आम्ही जगातील देशांना आधीच सांगितले आहे की त्यांनी पहिल्यांदा इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करावा. त्याशिवाय युद्धबंदी अशक्य आहे. इराण दीर्घ संघर्षासाठी तयार आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शेजारील देशांसोबत भारतासारख्या देशांच्या हिताचा नाही. या संघर्षामुळे सर्वांनाच त्रास होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Illegal Sand Mining: अवैध वाळू उपसा रोखण्‍यासाठी गोव्यात दिशानिर्देशांचे पालन होतेय का?

Gold Silver Rate Today: सोनं, चांदी झालं महाग! काय आहेत मुंबई, गोवा, पुणे आणि नागपुरात ताजे भाव? वाचा

'त्यांचे वय झाल्याने त्यांना आदल्या दिवशी काय बोललो, याची आठवण नसावी', वीजदरवाढीच्या गोंधळावरून आपची ढवळीकरांवर टीका

Goa Village Survey: 'मच्छीमार' गावांचे सीमांकन वादग्रस्त! तज्ज्ञांकडून तपासाची मागणी; नकाशांचा शहानिशा अनिवार्य

SCROLL FOR NEXT