Iran President Helicopter Crash Ebrahim Raisi Death: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्री आणि गव्हर्नर यांचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांनी या अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला. वृत्तानुसार, अपघाताचे प्राथमिक कारण खराब हवामान असल्याचे सांगितले गेले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग झाल्याचे सांगण्यात आले. इब्राहिम रईसी यांच्या निधनावर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे, यापुढे इराणची वाटचाल कोणत्या दिशेने होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र रईसी यांच्या मृत्यूच्या वृत्तावर इस्त्रायली माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
इस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने लिहिले की, ‘’राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी रईसी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खेमेनी यांच्या नेतृत्वाखाली न्यायव्यवस्थेत विविध पदांवर काम केले होते. 1988 मध्ये इराण-इराक युद्धाच्या शेवटी ते त्या समितीचा भाग होता, ज्याने हजारो राजकीय कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. हजारो लोकांना मारल्यानंतर, त्यांना "तेहरान (इराणची राजधानी) चा कसाई" म्हटले गेले होते.’’
लेखात पुढे असेही म्हटले आहे की, ‘’रईसी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या इस्रायलशी असलेल्या शत्रुत्वावर परिणाम होणार नाही. तसेच, इराण हमास आणि हिजबुल्लासारख्या गटांना पाठिंबा देणे थांबवणार नाही, जे सध्या इस्रायलशी युद्ध करत आहेत. रईसी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या योजनेवरही कोणताही परिणाम होणार नाही.’’
लेखात पुढे म्हटले की, ‘’इराणची राजवट वारंवार बसलेल्या धक्क्यांमुळे कमकुवत असल्याचे दिसून येते. इराण काही महिन्यांपासून कमजोर दिसत आहे. 3 जानेवारी रोजी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराणच्या एलिट कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल कासेम सुलेमानी यांच्या कबरीजवळ बॉम्ब टाकून 84 लोकांना मारले होते. अमेरिकन ड्रोनने मारले गेलेल्या सुलेमानी यांची चौथी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी हे लोक जमले होते. गेल्या महिन्यातच सुन्नी दहशतवादी संघटना जैश अल-अदलने 11 इराणी पोलिस अधिकाऱ्यांची हत्या केली होती.’’
'द जेरुसलेम पोस्ट' या इस्रायली वृत्तपत्राने एक विश्लेषणात्मक लेख प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘रईसी यांच्या मृत्यूचा इराणच्या देशांतर्गत राजकारणावर परिणाम होईल, परंतु शासन बदलणार नाही.’
लेखात पुढे असेही म्हटले आहे की, ‘’रईसी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या इस्रायलशी असलेल्या शत्रुत्वावर परिणाम होणार नाही. तसेच, इराण हमास (Hamas) आणि हिजबुल्लासारख्या गटांना पाठिंबा देणे थांबवणार नाही, जे सध्या इस्रायलशी युद्ध करत आहेत. रईसी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या अणुबॉम्ब बनवण्याच्या योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही.’’
जेरुसलेम पोस्टमधील दुसऱ्या लेखात असे म्हटले आहे की, ‘’रविवारी वायव्य इराणमध्ये खराब हवामानामुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन "हार्ड लँडिंग" च्या वृत्तानंतर, अनेक इस्रायली ज्यू धार्मिक नेत्यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले की, ‘हे सर्व देवाने केले आहे.’
धार्मिक नेता मीर अबुताबबुल यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये रईसी यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले असून त्यांना ‘तेहरानचा जल्लाद’ असे संबोधले. त्यांच्या पोस्टमध्ये अबुताबुल लिहितात की, 'त्यांना ज्यूंना वधस्तंभावर खिळायचे होते, म्हणून देवाने त्यांना आणि त्यांच्या सर्व इस्रायल-द्वेषी साथीदारांना हेलिकॉप्टर अपघातात (Accident) शिक्षा केली.' अबुताबुलने पुढे लिहिले की, ‘देवानेच रईसी यांना शिक्षा दिली.’
हारेत्ज या इस्रायली न्यूज वेबसाइटने लिहिले की, ‘’तासाभराच्या शोध मोहिमेनंतर बचाव पथकाला राष्ट्राध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर सापडले, जे पूर्णपणे जळालेले दिसून आले. सोमवारी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.