iran mysterious missile  Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US War: "खरा खेळ अजून सुरुच व्हायचाय!" इराणचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा; गुढ क्षेपणास्त्रांबाबत रशियाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब

Iran Israel War Update: इराण-अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इराणच्या लष्कराने एक खळबळजनक विधान करुन जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली.

Manish Jadhav

Iran Israel War Update: इराण-अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इराणच्या लष्कराने एक खळबळजनक विधान करुन जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली. इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धच्या संघर्षात इराणने आपल्या अफाट क्षेपणास्त्र क्षमतेचा केवळ एक छोटा हिस्सा वापरला असून आपली सर्वात प्रगत आणि घातक क्षेपणास्त्रे अद्याप सुरक्षित ठेवल्याचा दावा इराणने केला.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी रशियाने (क्रेमलिन) इराणकडे अशा काही 'गुढ' आणि जगाला अज्ञात असलेल्या क्षेपणास्त्रांचा साठा असू शकतो, असा दावा केला होता. इराणच्या ताज्या विधानामुळे रशियाच्या त्या दाव्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले असून, यामुळे अमेरिका (America) आणि इस्रायलच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल रेझा तलाई-निक यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अलीकडील 40 दिवसांच्या युद्धात इराणने मुद्दाम आपली पूर्ण लष्करी ताकद झोकून दिली नव्हती. युद्धविराम लागू होईपर्यंत इराणच्या (Iran) सशस्त्र दलांनी इस्रायलच्या ताब्यातील क्षेत्रांच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते, असा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणची क्षेपणास्त्र यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता, मात्र इराणने आता हा दावा खोडून काढत आपली 'खरी ताकद' अद्याप गुलदस्त्यात असल्याचे सूचित केले.

इराणच्या दाव्यानुसार, हा देश देशांतर्गत स्तरावर 1000 पेक्षा जास्त प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन करतो. संरक्षण प्रवक्त्यांनी बसिज आणि इतर सुरक्षा दलांमधील समन्वयाचे कौतुक करताना सांगितले की, देश प्रदीर्घ संघर्षासाठी पूर्णपणे सज्ज आहे. रशियाने इराणकडे 'कधीही न पाहिलेली' क्षेपणास्त्रे असल्याचे म्हटले होते, त्या पार्श्वभूमीवर इराणचे हे वक्तव्य पाश्चात्य देशांसाठी एक मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

अणुकेंद्र आणि लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यानंतरही इराणने आपली मोठी शस्त्रे वापरली नसल्याचे सांगून एक प्रकारे अमेरिकेला चर्चेच्या टेबलवर दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. सीजफायरनंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि जनसहभाग हा इराणसाठी एका 'सामाजिक चमत्कारा'सारखा असल्याचेही जनरल तलाई-निक यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

SCROLL FOR NEXT