Iran Israel Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Iran Israel War: इराणचे 120 क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केले! इस्राईलच्या प्रवक्त्यांचा दावा; सरकारी वृत्तवाहिनीवरही झाला हल्ला

Iran Israel Conflict: इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्षाचा आजचा चौथा दिवस होता. इराणच्या हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र प्रणालीवर सातत्याने मारा करून या दोन्ही यंत्रणा नष्ट केल्याचे इस्राईलचे म्हणणे आहे.

Sameer Panditrao

इराण: इराणने आज सकाळीच इस्राईलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात इस्राईलमधील किमान पाच जणांचा मृत्यू झाला. तर, इस्राईलनेही आज इराणच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. यामुळे इराणमध्ये कोठेही आमची लढाऊ विमाने बिनधोक जाऊ शकतात, असाही विश्‍वास इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्षाचा आजचा चौथा दिवस होता. इराणच्या हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र प्रणालीवर सातत्याने मारा करून या दोन्ही यंत्रणा नष्ट केल्याचे इस्राईलचे म्हणणे आहे.

‘‘इराणचा पश्‍चिम भाग ते तेहरान या टप्प्यापर्यंतच्या हवाई क्षेत्रावर आम्ही वर्चस्व मिळविले आहे. या भागातील इराणचे १२० क्षेपणास्त्र प्रक्षेपक आम्ही नष्ट केले आहेत. याच प्रक्षेपकांद्वारे इराण आमच्या देशांवर मारा करत होता,’’ असे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी यांनी सांगितले.

वृत्तवाहिनीवर धडकले क्षेपणास्त्र

युद्धाची दाहकता इतकी वाढली आहे की, इराणच्या आयआरआयबी या सरकारी वृत्तवाहिनीवर बातम्यांचे थेट प्रक्षेपण सुरू असताना इस्त्रायलने सोडलेले एक क्षेपणास्त्र येऊन धडकले. तेव्हा न्यूज अँकर प्रचंड घाबरली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT