IRGC Iran Warning To Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

IRGC Iran Warning To Donald Trump: इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) स्पष्ट केले की, युद्धाची सुरुवात आणि शेवट करण्याचा अधिकार केवळ इराणकडे आहे.

Manish Jadhav

IRGC Iran Warning To Donald Trump: मध्यपूर्वेतील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे युद्ध अत्यंत कमी कालावधीत संपवू, असे विधान केले होते. ट्रम्प यांच्या या दाव्याचा इराणने तीव्र शब्दांत निषेध करत त्यांना उघड आव्हान दिले.

इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) स्पष्ट केले की, युद्धाची सुरुवात आणि शेवट करण्याचा अधिकार केवळ इराणकडे आहे, अमेरिकेच्या इच्छेनुसार हे युद्ध थांबणार नाही. आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुज्तबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यापासून इराणचा आक्रमक पवित्रा अधिकच वाढला असून, अमेरिकेसोबतचा हा वाद आता जगाच्या अर्थव्यवस्थेला खिळ घालण्याच्या उंबरठ्यावर आहे.

इराणच्या (Iran) आयआरजीसीने (IRGC) जारी केलेल्या निवेदनात अमेरिकेवर कडक ताशेरे ओढले. "क्षेत्राचे भवितव्य आणि युद्धाची समीकरणे आता आमच्या सशस्त्र दलांच्या हातात आहेत. अमेरिकन सैन्याला हे युद्ध संपवण्याचा कोणताही अधिकार नाही," असे इराणने ठणकावून सांगितले. ट्रम्प यांच्या विधानाला इराणने 'धोकादायक चालाकी' आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

विशेष म्हणजे, अमेरिकन नौदलाच्या 'यूएसएस अब्राहम लिंकन' या युद्धनौकेवर इराणने क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिकन सैनिक आणि जहाजे इराणच्या हल्ल्याच्या भीतीने 1000 किलोमीटरपेक्षा जास्त दूर पळाल्याचा दावाही इराणने केला. इराणने अमेरिकन सैनिकांचा उल्लेख 'भित्रे' असा करत, आपल्याकडे क्षेपणास्त्रांचा साठा कमी झालेला नसून ते आता अधिक शक्तिशाली झाल्याचे म्हटले. इराणच्या काही वॉरहेड्सचे वजन एक टनपेक्षा जास्त असून ते शत्रूचा नायनाट करण्यास सक्षम असल्याचा इशाराही देण्यात आला.

दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला "20 पट जास्त जोराने मारु" अशी धमकी दिली. जर इराणने होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) रोखून धरली आणि जगाचा तेल पुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका इराणला अशा प्रकारे नष्ट करेल की तो देश म्हणून पुन्हा कधीही उभा राहू शकणार नाही, असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. ट्रम्प यांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीला चीन आणि इतर तेल-अवलंबित देशांसाठी 'अमेरिकेकडून मिळालेली भेट' असे संबोधले.

जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गावरुन होते, त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केल्यास जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात. इराणने देखील इशारा दिला की, जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत ते या भागातून एका लिटर तेलाचीही निर्यात होऊ देणार नाहीत.

या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर आधीच दिसू लागला आहे. नवीन सर्वोच्च नेत्याच्या नियुक्तीनंतर तेलाच्या किमती 2022 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या होत्या. मात्र, ट्रम्प यांनी काही देशांवरील निर्बंध हटवण्याचे संकेत दिल्यानंतर या किमतीत थोडी घट झाली होती. आता इराण आणि अमेरिका यांच्यातील ही शाब्दिक चकमक प्रत्यक्ष युद्धाचे रुप घेते की काय, या भीतीने जागतिक समुदायामध्ये चिंतेचे वातावरण आहे. इराणने आपली लष्करी ताकद आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान अधिक प्रगत केल्याचा दावा केल्यामुळे, अमेरिकेसाठी (America) हे 'कमी कालावधीचे अभियान' राहण्याची शक्यता धूसर दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

SCROLL FOR NEXT