Inflation In England
Inflation In England Dainik Gomantak
ग्लोबल

Inflation In England : इंग्लंड महागाईने होरपळतेय; दोन वेळच्या अन्नासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष

दैनिक गोमंतक

कोरोना महामारीदरम्यान जगभरातील अनेक देशांना अर्थिक फटक्यांना सामोर जावे लागले आहे. हीच स्थिती आता इंग्लंडमध्ये असून अभूतपूर्व महागाईने कहर केला आहे. कारण इंग्लंडमधील अनेक कुटुंबांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र आहे.

( Inflation has increased in England and many families in the country are struggling to even get two meals a day)

मिळालेल्या माहितीनुसार लंडनमधील सेंट मेरीज प्रायमरी स्कूलमध्ये शिकणारी जवळपास अर्धी मुले ही सर्वात गरीब कुटुंबातील आहेत. गगनाला भिडणाऱ्या महागाईने मूलभूत गोष्टी खूप महाग झाल्याने त्यांच्यावर ही स्थिती आली असल्याचा दावा एका धर्मादाय संस्थेने केला आहे. त्यामुळे धर्मादाय संस्था सरकारला या मुलांना मोफत शालेय जेवण देण्याची मागणी करत आहेत. असे असले तरी आतापर्यंत पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारने अशा संस्थांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत.

मोफत अन्न मिळविण्यासाठी सरकारने घातली मर्यादा

इंग्लंड प्रशासनाच्या नियमानुसार मोफत अन्न मिळविण्यासाठी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न $9,163 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सटन ट्रस्टच्या मते, या महागाईच्या काळात इंग्लंडमध्ये मुलांना जेवण देणे देखील विचार करावा लागत आहे. तसेच वार्षिक उत्पन्न $9,163 पेक्षा कमी असलेल्या कुटुंबांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या कुटुंबांचा समावेश न केल्याने संघटनेने सरकारवर टीका केली. त्यामुळे ऋषी सुनक यांच्या सरकारची परीक्षा आता सुरु झाली आहे.

युरोपमध्ये महागाईने हाहाकार

सध्या युरोपमधील अनेक भागात महागाईने हाहाकार उडाला आहे. याबाबत शाळेचे नेतृत्व करणार्‍रा एका सदस्य क्लेअर मिशेल यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या इंग्लडमध्ये "इतकी वाईट स्थिती आहे की खुपसारी मुले आणि त्यांची कुटुंबे यांना उदरनिर्वाहासाठी आणि दोन वेळच्या खाण्यासाठी देखील संघर्ष करत आहेत."

कोरोनानंतर परिस्थिती आणखी बिघडली

याबाबत माहिती देताना एका व्यक्तीने माहिती दिली की, “आम्हाला हा बदल साथीच्या रोगाच्यादरम्यान पहिल्यांदा लक्षात आला, यावेळी कुटुंबे नोकऱ्या गमावत होती. सटन ट्रस्टच्या मते, महागाईच्या ताज्या काळात इंग्लंडमध्ये शालेय जेवण परवडत नसलेल्या कुटुंबांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

SCROLL FOR NEXT