Indonesia Wedding Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

Wedding Stage Fight Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Indonesia Wedding Viral Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. इंडोनेशियातील एका लग्नाचा हा व्हिडिओ असून त्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. आपल्या लग्नाच्या फोटो सेशनदरम्यान नवऱ्या मुलाच्या एक्स प्रेयसीने (Ex-Girlfriend) असे काही धाडस केले, ज्यामुळे नवरीचा संयम सुटला. संतापलेल्या नवरीने सर्वांसमोर या तरुणीचे केस धरुन तिला खाली पाडले आणि मांडवातच मोठा गदारोळ झाला.

काय घडलं नक्की?

दरम्यान, हा व्हिडिओ 'एक्स'वर @mog_russEN नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, फुलांनी सजवलेल्या एका स्टेजवर नवदाम्पत्याचे फोटो सेशन सुरु आहे. दोघेही पारंपरिक इंडोनेशियन पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहेत. मात्र, तितक्यात नवऱ्या मुलाची 'एक्स' प्रेयसी स्टेजवर येते. ती जवळ येते आणि नवऱ्या मुलाचा हात धरुन तो किस करण्याचा प्रयत्न करते.

सांस्कृतिक परंपरेचा गैरवापर?

इंडोनेशियन मुस्लिम (Muslim) संस्कृतीत हाताचा किस घेणे हे आदराचे प्रतीक मानले जाते. ही कृती सहसा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रती किंवा पत्नीने पतीच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी केली जाते. मात्र, या तरुणीने भर लग्नात सर्वांसमोर हे धाडस केल्याने नवरीबाईचा पारा चढला. तिने विचार न करता त्या तरुणीचा खांदा घट्ट पकडला आणि तिचे केस ओढून तिला जोरात धक्का दिला. यामुळे ती स्टेजवरच कोसळली.

नवऱ्या मुलाची शांत भूमिका

या संपूर्ण वादाच्या वेळी नवऱ्या मुलाची प्रतिक्रिया सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरली. नवरी आणि त्याच्या प्रेयसीमध्ये हा मोठा राडा होत असतानाही तो एखाद्या पुतळ्यासारखा शांत उभा होता. त्याने आपल्या पत्नीला शांत करण्याचा किंवा त्या तरुणीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याच्या या भूमिकेवर आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

नेटकऱ्यांच्या मजेशीर आणि संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने नवरीच्या कृतीचे समर्थन करत लिहिले की, "ती तरुणी यापेक्षाही जास्त शिक्षेस पात्र होती." दुसऱ्या एका युजरने नवऱ्या मुलावर निशाणा साधत म्हटले, "तो तिथे शांत का उभा आहे? त्याने तिला थांबवायला हवे होते. मी असतो तर दोघांनाही चोप दिला असता." एका युजरने मिश्किल टिप्पणी केली की, "नवरीने त्या तरुणीला इतक्या वेगाने पकडले, जशी कॉस्टकोमध्ये फ्री सॅम्पल घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळते."

सध्या हा व्हिडिओ केवळ इंडोनेशियातच (Indonesia) नव्हे, तर जगभर व्हायरल होत असून 'एक्स'वर याला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नातेसंबंधांमधील जुन्या प्रकरणांमुळे लग्नात कसे विघ्न येऊ शकते, याचे हे एक जिवंत उदाहरण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

SCROLL FOR NEXT