Live In Relationship Dainik Gomantak
ग्लोबल

Live In Relationship: 'या' देशात लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास

Indonesia New Law: लिव्ह इन रिलेशनशिपची म्हणजे लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्ती ही संकल्पना पाश्चात्य देशांतून भारतात आली आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशिया देशाने नवा कायदा मंजूर केला आहे. या अंतर्गत लग्नाशिवाय लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्यास आता बंदी घातली आहे. मंगळवारी इंडोनेशियन संसदेने लग्नापुर्वी लिव्ह-इन संबंधांना गुन्हेगार ठरवणारा नवीन कायदा मंजूर केला आहे. तसेच विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना एका वर्षाची शिक्षा होणार आहे.

यापूर्वीही अनेक देशांनी या कायद्यातील सुधारणांना विरोध केला. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम-बहुसंख्य राष्ट्र कट्टरतावादाकडे वळल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

इंडोनेशियाच्या या नवीन विधेयकाच्या कलम 413 (1) नुसार, जर एखादी व्यक्ती अशा व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते, जे एकमेकांचे पती किंवा पत्नी नसतील तर त्याला या व्याभिचारासाठी 1 वर्ष सश्रम कारावास किंवा श्रेणी II अंतर्गत मोठ्या दंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

  • पाकिस्तानातही बंदी

इंडोनेशिया हा असा पहिला देश नाही की जिथे लग्नापूर्वी शारीरिक संबंधावर बंदी आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये एका अध्यादेशानुसार, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्यास पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

  • लिव्ह-इनमध्ये राहणे म्हणजे काय?

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्ती होय. ही संकल्पना पाश्चात्य देशांतून भारतात (India) आली आहे. पूर्वीच्या भारतीय संस्कृतीत (Culture) स्त्री-पुरुषाने लग्नाशिवाय एकत्र राहणे योग्य मानले जात नव्हते. परंतु बदलत्या काळात ही संकल्पना भारतातही स्वीकारली जाऊ लागली आहे. आता मोठ्या प्रमाणात ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण यासाठी काही नियम सांगण्यात आले आहे. प्रत्येक जोडप्याने या नियमांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याचे पालनही केले पाहिजे. दोन प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीने एकमेकांसोबत राहू शकतात आणि कायद्याच्या दृष्टीने ते बेकायदेशीर नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. कोर्ट अशा जोडप्याला पारंपारिक विवाहात राहणारे जोडपे मानते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'झोपतो म्हणून गेला, घरातले 3 लाख घेऊन गोव्याला पळाला'; परीक्षेच्या ताणामुळे गुजरातच्या विद्यार्थाने उचलले धक्कादायक पाऊल

VIDEO: पाकच्या 'बाबर'ने तोडला 'अभिषेक शर्मा'चा विक्रम, केली तुफान फटकेबाजी; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Goa Petrol Diesel Price Today: जानेवारीअखेर गोव्यात 'पेट्रोल - डिझेल'चे काय आहेत दर? जाणून घ्या

Tragic Death: दुर्दैवी घटना! विजेचा खांब उभारताना कोसळला, बिहारच्या कामगाराचा कुडतरीत मृत्यू; निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Rashi Bhavishya: स्वप्न होणार पूर्ण! नवीन व्यवसायाची तयारी करा; 'या' राशींना मिळणार मोठी बातमी

SCROLL FOR NEXT