Maldives President Muhammad Muizzu Dainik Gomantak
ग्लोबल

Maldives: मालदीव सरकारच्या 'इंडिया आऊट' धोरणाचा सामान्य नागरिकांना फटका

Maldives: या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

दैनिक गोमन्तक

Indian teachers leaves Maldives

मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने भारतविरोधी कारवाया आणि चीनधार्जिने धोरण सरकार स्विकारत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मालदीवमधील भारतीय शिक्षकांनी मायदेशी परत येण्याचा निर्णय घेतल्याने सरकारला मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवच्या संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले असून मुइज्जू सरकारला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

मालदीव मीडिया आउटलेट आधारधूच्या वृत्तानुसार, मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार मोहम्मद शाहिद यांनी संसदेत सरकारला प्रश्न विचारला की मोहम्मद मुइज्जू यांच्या इंडिया आऊट मोहिमेमुळे अनेक शिक्षकदेखील मालदीवमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे देशात शिक्षकांची कमतरता असून मुलांचे शिक्षण ( Education ) विस्कळीत होत आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना मालदीवचे शिक्षण मंत्री डॉ. इस्माईल शफीफू यांनी सांगितले की, शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे कोणतीही संकटाची परिस्थिती निर्माण झालेली नसून जेव्हा एखादा शिक्षक निघून जातो तेव्हा काही आठवडे आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा मालदीवमध्ये येणारे परदेशी शिक्षक लवकर परत जातात, असेही ते म्हणाले.

मोदीं( PM Modi )च्या लक्षद्वीपमधील फोटोंवर मालदीवमधील मंत्र्यांनी टीकाटिप्पणी केली होती. त्यानंतर भारत- मालदीवमध्ये वाद होताना पाहायला मिळाला होता. आता या दोन देशातील संबंधात कोणते बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT